कृषीनांदेड

Ardhapur : अर्धापूरात संतप्त केळी उत्पादक शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन

नांदेड| काल रात्री झालेल्या वादळी वाऱ्यामुळे अर्धापूर शहरातील व तालुक्यातील केळीच्या सर्व बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.

निसर्गाच्या प्रकोपाला बळी पडलेल्या संतप्त केळी उत्पादक शेतकऱ्यांनी तात्काळ आर्थिक मदत मिळावी यासाठी अर्धापूरात रस्ता रोको आंदोलन केले आहे. अर्धापूर येथील केळी उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान व व्यथा उपजिल्हाधिकारी सचिन खल्लाळ यांनी राज्य शासनाला तात्काळ सांगितले आहेत.

IMG 20250610 WA0046 Ardhapur : अर्धापूरात संतप्त केळी उत्पादक शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन

वादळी वारे व मुसळधार पावसामुळे काल भोकर विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अर्धापूर तालुक्यात प्रामुख्याने केळी व इतर पिकांना प्रचंड फटका बसला. मुदखेड तालुक्यात अनेक ठिकाणी तर भोकर तालुक्यातही काही ठिकाणी नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे. जिल्हाधिकारी व संबंधित सर्व तहसीलदारांशी संपर्क साधून मी परिस्थितीचा आढावा घेतला व आवश्यक त्या सूचना दिल्या. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे आजपासूनच होत आहेत. अशी प्रतिक्रिया खासदार अशोक चव्हाण यांनी दिली.

505810347 1258778738944557 2435954311317843048 n Ardhapur : अर्धापूरात संतप्त केळी उत्पादक शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!