क्राईमनांदेड

Gambling Reided : मांजरा नदी पात्रात चालणा-या जुगार अड्ड्यावर उप.वी. पोलिस अधिकाऱ्यांच्या पथकाची धाड

बिलोली, गोविंद मुंडकर| महाराष्ट्र व तेलंगणा या दोन राज्याच्या सिमेवरून वाहणाऱ्या बिलोली तालुक्यातील कार्ला येथील मांजरा नदी पात्रात चालणा-या जुगार अड्ड्यावर दि.७ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास उप विभागीय पोलिस अधिकारी शाम पानेगावकर यांच्या नायगाव व रामतीर्थ येथील पोलिस स्टेशनच्या पथकाने धाड टाकली. या धाडीत महाराष्ट्र व तेलंगणातील १२ जुगाऱ्यांसह जवळपास २ लाख ३४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की दोन राज्याच्या सीमेवर असलेल्या बिलोली तालुक्यातील सीमा भागात असलेल्या कार्ला येथे रात्रीच्या सुमारास अंदर बाहेर नामक जुगार खेळल्या जात असल्याची गुप्त माहिती प्राप्त होताच बिलोलीचे उप विभागीय पोलिस अधीकारी शाम पानेगावकर यांनी नायगाव व रामतीर्थ पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक तयार करून जुगार अड्ड्यावर कारवाई करण्याच्या सुचना दिल्या होत्या.त्यानुसार दि.७ डिसेंबर रोजी रात्री नऊ वाजताच्या सुमारास उपविभागीय पोलीस अधिकारी शाम पानेगावकर यांच्या पथकाने बिलोली तालुक्यातील कार्ला येथील राजू पाटील यांच्या शेताच्या पूर्वेस मांजरा नदीपात्रात बेकायदेशीर रित्या सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकली.

या धाडीत पोलिसांनी जुगार खेळणाऱ्या महाराष्ट्र व तेलंगणा राज्यातील १२ जुगाऱ्यांवर कारवाई करत घटनास्थळावरून रोख ८७ हजार रूपये रोख,१० मोबाईल, एक मोटर सायकल व जुगार खेळण्याचे साहित्य असा एकूण २ लाख ३४ हजार ३०० रुपयाचा मुद्येमाल जप्त केला आहे. सदर कारवाई बिलोली चे उपविभागीय पोलीस अधिकारी शाम पानेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली नायगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गजानन तोटेवाड, पुणेबोईनवाड,शिंदे, पवार,मुसळे,भंडारे यांच्या सह रामतीर्थ पोलिस स्टेशन चे काळे,शिंदे, एरपलवार,बेळीकर आदींनी पार पाडली असून या प्रकरणाचा पुढील तपास बिलोली पोलिस स्टेशनचे पोलिस उप निरीक्षक विजय पंतोजी हे करीत आहेत.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!