Wednesday, May 13

Illegal Business | हिमायतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व प्रकारचे अवैध धंदे तात्काळ बंद करावेत – NNL

हिमायतनगर| शहर व ग्रामीण परिसरात सर्वच प्रकारचे अवैध धंदे बिनदिक्कत पणे चालत आहेत. या अवैध धंद्यात बोटावर मोजण्या इतक्या लोकांना दोन पैश्याचा फायदा मिळत असला तरी हजारो लोकांचे संसार उघडय़ावर येत आहेत. ही बाब गंभीर स्वरूपाची ठरत असून, हजारो नागरिकांची होणारी अर्थिक लूट व त्यांच्या जीवितास होणारी हानी थांबवण्या करीता शहरातील सर्व प्रकारचे अवैध धंदे तात्काळ बंद करण्यात यावे. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मनोज उर्फ बंटी गुडेटवाड यांनी केली आहे.

IMG 20240710 WA0033 Illegal Business | हिमायतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व प्रकारचे अवैध धंदे तात्काळ बंद करावेत - NNL

नूतन पोलीस निरीक्षक अमोल भगत यांना दिलेल्या तक्रार निवेदनात बंटी गुडेटवाड यांनी म्हटले आहे की, शहरात मटका, गुटखा, अवैध देशी व विदेशी दारू विक्री, जुगार यासह अनेक प्रकारचे अवैध धंदे बिनदिक्कत चालू आहेत. पोलीसांकडून अपेक्षित कारवाई होत नाही.म्हणूनच अवैध धंदे वाल्याचे चांगलेच फावत आहे. मटका बुक्या शहरातील चौका चौकात थाटण्यात आल्या आहेत.

IMG 20240710 WA0037 Illegal Business | हिमायतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व प्रकारचे अवैध धंदे तात्काळ बंद करावेत - NNL

मटक्याच्या आहारी गेलेले नागरिक तासंतास मटक्याची उजळनी करण्यात आपला वेळ व पैसा बरबाद करीत आहेत. तर व्यसनाधीनता प्रकर्षानं वाढत आहे. ही बाब अतिशय गंभीर स्वरूपाची ठरत आहे. आणी म्हणून शहरातील अवैध धंदे बंद करणे खर्या अर्थाने काळाची गरज आहे. या बाबीकडे नव्याने रूजू झालेले पोलीस निरीक्षक अमोल भगत यांनी तात्काळ लक्ष पुरवून या ठिकाणचे सर्व प्रकारचे अवैध धंदे बंद करण्यात यावे, अशी मागणी मनोज उर्फ बंटी गुडेटवाड यांनी केली आहे. पोलिसांकडून उपरोक्त कारवाईस विलंब अथवा टाळा टाळ झाल्यास तिव्र आंदोलन छेडण्यात येईल. असा इशाराही देण्यात आला असून निवेदनावर अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!