हिमायतनगर, दत्ता शिराणे। आगामी विधान सभा निवडणुकीची घटिका अगदी समिप येत असल्याने इच्छुक उमेदवार आपल्या पक्ष श्रेष्ठीकडे उमेदवारीची मागणी लावून धरत आहेत. हदगाव, हिमायतनगर विधान सभा मतदार संघात ही इच्छुकांची गर्दि दिवसेंदिवस वाढतच आहे. परवाच माजी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री श्रीमती सूर्यकांता पाटील यांनी भाजपला अखेरचा जयश्रीराम करून स्वगृही परतल्या आहेत. त्या आता महाविकास आघाडीकडून शरदचंद्र पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून हदगाव हिमायतनगर विधान सभेची निवडणूक लढविण्याची तयारी करीत आहेत. या अगोदर पासूनच माजी खासदार सुभाष वानखेडे हे तयारीत असल्याचे त्यांनी सुतोवाच केले आहे. आणखीन एक जन तयारीतच असल्याचे सांगण्यात येत आहे.


हदगाव हिमायतनगर विधान सभा मतदार संघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. काँग्रेस चे विद्यमान आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांचा २००९ चा टर्म व २०१९ चा टर्म वगळला तर माजी खासदार तथा तत्कालीन आमदार सुभाष वानखेडे यांनी शिवसेनेकडून सलग १५ वर्ष या मतदार संघाचे नेतृत्व केलेले आहे. त्यानंतर २०१४ ला हिंगोलीचे विद्यमान खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी शिवसेनेकडून विजयश्री मिळविली. आता नागेश पाटील आष्टीकर लोकसभेला जावून निवडून ही आले असल्याने हदगाव हिमायतनगर मतदार संघातून एक मोठा नेता आपसूकच मैदाना बाहेर गेला आहे. आता आगामी निवडणूक हरणाच्या गतीने जवळ येत असल्याने इच्छुकांनी आपला मोर्चा आप आपल्या पक्ष श्रेष्ठीकडे वळविला आहे.

लोक सभेच्या निवडणूकीत महा विकास आघाडीला चांगल्या प्रकारे यश मिळाले असल्याने आता विधान सभेच्या ही निवडणूका काँग्रेस, राष्ट्र वादी शरद पवार गट, शिवसेना उद्धव ठाकरे गट व मित्र पक्ष महाविकास आघाडी करूण च लढविणार हे आता जवळपास निश्चितच असल्याने महाविकास आघाडीकडून आपसूकच इच्छुकांची संख्या वाढत आहे. सध्यातरी महाविकास आघाडीकडून विद्यमान आमदार माधवराव पाटील जवळगावकर, व श्रीमती सूर्यकांता पाटील, सुभाषराव वानखेडे, तर खासदार पुत्र कृष्णा पाटील आष्टीकर हे ही या इच्छुक असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयातून सांगीतले जात आहे.

आता या भाऊ गर्दीतून आमदार माधवराव पाटील जवळगावकर हे कसा मार्ग काढतात. हे पाहणे औत्सुक्यात्याचे ठरणार आहे. तर महाविकास आघाडी कायम त्याच प्रमाणे लोक सभे प्रमाणे राज्यात महायुती कायम राहणार हे आता जवळपास निश्चितच आहे. भाजप शिवसेना शिंदे गट व इतर मित्र पक्ष महायुतीकडून लोकनेते बाबुराव कदम कोहळीकर हे एकमेव सध्यातरी चर्चेत आहेत. मात्र आमदार जवळगावकरांना आपल्या मार्गातील स्पीड ब्रेकर मोडीत काढूनच मार्गक्रमण कारावा लागणार आहे. एवढे मात्र निश्चित….!
