Prahar activists : हिमायतनगर तालुक्यातील प्रहार कार्यकर्ते उतरले बच्चू कडूच्या समर्थनात मैदानात

हिमायतनगर, अनिल मादसवार| शेतकरी, कष्टकरी, दिव्यांग, शेमजूर, मेंढपाळ, मच्छीमार व कामगार यांच्या न्याय्य हककच्या मागण्यांसाठी बच्चू कडू यांनी नुकतीच पदयात्रा काढली. तरीदेखील शासनाने कर्जमाफी केली नाही, त्यामुळे दिनांक 24 जुलै 2025 गुरुवारी पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी चक्काजाम आंदोलनातं हिमायतनगर तालुक्यातील प्रहारच्या कार्यकत्यांनी मैदानात येऊन गांधीगिरी संपली आता भगतसिंगगिरी सुरू झाली आहे. असे म्हणत आत्तातरी शासनाने तात्काळ मागण्या मान्य करून सलाईनवर असलेल्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी करून शांततेच्या मार्गाने आंदोलन केले आहे. दरम्यान “चक्काजाम” आंदोलनामुळे दोन तास वाहतूक विसकळीत झाली होती.


शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह शेतमजूर, दिव्यांग आणि ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यासाठी बच्चू कडू (Bacchu Kadu) आक्रमक झाले आहेत. त्यांच्या प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवार दिनांक २४ रोजी “चक्काजाम” आंदोलन केलं आहे. “शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा” या मुख्य मागणीसाठी बच्चू कडूंनी विदर्भात पदयात्रा काढली होती. यात्रेदरम्यानच आंदोलनाची दिशा ठरवण्यात आली. आता सरकारला दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी रस्त्यावरची लढाई सुरू झाली आहे.

हिमायतनगर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग सोनारी फाटा येथे सकाळी १० वाजता शांततेच्या मार्गाने चक्का जाम आंदोलन करण्यांत आले. नेते बच्चू कडू यांच्या संघर्षमय कार्याची आठवण ठेवत प्रहार कार्यकर्ते मैदानात उतरले. त्यांच्या नेतृत्वातून प्रेरणा घेत अनेक कार्यकर्ते जनतेच्या समस्या ऐकण्यासाठी, अन्याया विरोधात आवाज उठवण्यासाठी सज्ज झाले असल्याचे पाहावयास मिळाले आहे. शेतकरी, दिव्यांग, शेजगजुर, मेंढपाळ, मच्छीमार, कामगार आदिसह प्रमुख शेतकरी कर्जमाफी तात्काळ जाहिर करण्यात येऊन शेकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यात यावा. अशी मागणी लावून धरण्यात आली असून, आंदोलना दरम्यान पोलिसांनी प्रहारच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन सोडून दिले असले तरी कार्यकर्त्यांनी शासन आमचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे.



शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित अपंग व वंचितांना न्याय मिळावा यासाठी हा छोटासा प्रयत्न असल्याचे सांगत तात्काळ शेतकऱ्यांसह स्थानिक समस्यांवर उपाययोजना करावी. यासाठी आजचे आंदोलन संस्थापक आ.बच्चू कडू, जिल्हा प्रमुख विठ्ठलराव कल्याणकर, हदगांव-हिमायनगर विधानसभा अध्यक्ष अनिल दिगंबर कदम यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले असल्याची माहिती प्रहारचे तालुका प्रमुख दत्ता पंडीतराव देशमुख यांनी दिली आहे. या आंदोलनात शेतकरी, कष्टकरी, दिव्यांग, निराधार नागरिकासह काँग्रेस, स्वराज्य पक्ष व अन्य पक्षाच्या पदाधिकारी यांनी सहभाग घेतला होता.




