नांदेडमहाराष्ट्र

Protest : छावा संघटनेचे विजय घाडगे यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या नांदेडमध्ये निषेध

नांदेड| अखिल भारतीय सेवा संघटनेचे विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार गाडगे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे लातूर येथे आले असता कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची काम करण्याची पद्धत ही शेतकऱ्यांसाठी घातक असून त्यांना सभागृहामध्ये बसून पत्ते खेळायला वेळ आहे.पण शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नाही असे म्हणत एक प्रतीकात्मक आंदोलन म्हणून काही पत्त्यांचे डाव त्यांच्यासमोर टाकण्यात आले.

हा राग मनात धरून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी 15 ते 20 सहकाऱ्यांच्या मदतीने शेतकऱ्यांचे नेते विजय घाडगे यांच्यावर हल्ला चढवला आणि चळवळीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. या निषेधार्थ अखंड महाराष्ट्रावर याचे प्रसाद उमटत असून त्याच अनुषंगाने नांदेडमध्ये सुद्धा सकल मराठा समाजाच्या वतीने या राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी व हा लेख वर सुरज चव्हाण व त्यांच्या सर्व साथीदारांना कडक शासन करून माणिकराव कोकाटे कृषी यांचा कृषिमंत्री पदाचा राजीनामा घेण्यात यावा.

IMG 20250721 WA0045 Protest : छावा संघटनेचे विजय घाडगे यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या नांदेडमध्ये निषेध

अशी मागणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे करण्यात आली व झालेल्या कृतीचा निषेध म्हणून सकल मराठा समाजातर्फे टायर जाळून रोष व्यक्त करण्यात आला. या आंदोलनात दशरथ पाटील कपाटे, श्याम पाटील वडजे, सुभाष पाटील कोल्हे, सत्तार पठाण यांच्यासह इतर उपस्थित होते यावेळी वजीराबाद पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन दंडात्मक कारवाई करत सोडून दिले.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!