Protest : छावा संघटनेचे विजय घाडगे यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या नांदेडमध्ये निषेध
नांदेड| अखिल भारतीय सेवा संघटनेचे विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार गाडगे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे लातूर येथे आले असता कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची काम करण्याची पद्धत ही शेतकऱ्यांसाठी घातक असून त्यांना सभागृहामध्ये बसून पत्ते खेळायला वेळ आहे.पण शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नाही असे म्हणत एक प्रतीकात्मक आंदोलन म्हणून काही पत्त्यांचे डाव त्यांच्यासमोर टाकण्यात आले.
हा राग मनात धरून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी 15 ते 20 सहकाऱ्यांच्या मदतीने शेतकऱ्यांचे नेते विजय घाडगे यांच्यावर हल्ला चढवला आणि चळवळीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. या निषेधार्थ अखंड महाराष्ट्रावर याचे प्रसाद उमटत असून त्याच अनुषंगाने नांदेडमध्ये सुद्धा सकल मराठा समाजाच्या वतीने या राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी व हा लेख वर सुरज चव्ह...
