हदगाव, शेख चांदपाशा| सलग अविरत कोसळणाऱ्या पावसामुळे हदगाव शहरातील मौलाना गल्ली परिसरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. रस्ते, गल्ल्या व नाल्यांमध्ये पाणी शिरल्याने नागरिक भयभीत झाले होते. वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला.



या बिकट परिस्थितीत खासदार नागेश पाटील आष्टीकर स्वतः घटनास्थळी दाखल झाले. नागरिकांचे हाल, त्यांची हतबलता जवळून अनुभवत लोकांना धीर दिला. आणि “कसलंही संकट असो… मी तुमच्यासोबत आहे. कुठलीही अडचण आली तर मला तात्काळ सांगा,” असा विश्वास व्यक्त केला.



यावेळी खासदार आष्टीकर यांनी तात्काळ नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांना कामाला लावले. तसेच उपविभागीय अधिकारी (SDM) हदगाव यांना घटनास्थळी बोलावून घेतले. नाल्यांचे पाणी रस्त्यावर आल्याने नागरिकांना ये-जा करण्यास अडचणी येत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. यावर तात्काळ उपाययोजना म्हणून नव्याने बांबू अगोदर टाकण्याच्या सूचना खासदारांनी दिल्या. दरम्यान, विजांचा गडगडाट अतिवृहस्तीचा तुफान पाऊस यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असले तरी खासदारांच्या तात्काळ हस्तक्षेपामुळे जनतेच्या मनात नवा विश्वास निर्माण झाला आहे.





