लोहा| जिल्हयात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. शनिवारी भल्या पहाटे पासून लोहा कंधार तालुक्यासह जिल्ह्याच्या अनेक भागात जोरदार मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे सकाळीच अनेक गावात पुर परिस्थिती उदभवली काही गावांचे संपर्क तुटले. शिवाय शनिवारी दुपारी पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. प्रशासन खबरदारी घेत आहे मी व अधिकारी अनेक ठिकाणी गेलो तेथील उदभवलेल्या पूर परिस्थितीची पाहणी केली. लोकांच्या अडीअडचणी सोडविल्या काही ठिकाणी लोकांचे स्थलांतर केले. अजून पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. अश्या परिस्थितीत लोहा – कंधार सह जिल्ह्यातील नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये आम्ही सोबत आहोत. काहीही समस्या असेल तर कळवावे असे आवाहन आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले.



शनिवारी ( ता.२७ सप्टेंबर) सकाळपासून आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी लोहा कंधार तालुक्यातील ज्या गावात पूर परिस्थिती निर्माण झाली. तेथील लोकांच्या समस्या मोबाईल द्वारे जाणून घेतल्या तात्काळ एसडीओ ,तहसीलदार मुख्याधिकारी ,वीज महावितरण ,सार्वजनिक बांधकाम विभाग यांना सांगून त्या त्या गावातील समस्या सोडविल्या. लोहा शहरातील काही भागात दुकानात पाणी शिरले तेथे जाऊन पाहणी केली व्यापाऱ्यांचे म्हणणे जाऊन घेतले. जुन्या शहरात, गोल्डन सिटीत पुराचे पाणी शिरले तेथे सकाळीच नगर पालिका यंत्रणापाठविली. काही गावात पुरात अडकलेल्याच्या घटना समोर आल्या. तेथे तहसीलदार यांना सांगून तात्काळ मदत पाठविली शनिवारी दुपारी धो धो पाऊस सुरु होता असा परिस्थितीत आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर हे पूरग्रस्त भागात लोकांच्या भेटीला गेले. त्याच्या अडीअडचणी जाऊन घेतल्या.काही कुटुंबाचेसुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचा सूचना दिल्या. त्याच्या भोजनाची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले.



तहसीलदार विठ्ठल परळीकर, मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे, माजी नगराध्यक्ष किरण वट्टमवार, केशवराव मुकदम, हंसराज पाटील बोरगावकर, मारुती पाटील बोरगावकर, दता वाले , भास्कर पाटील, महावितरण उपअभियंता श्री सुतार, बांधकाम उपअभियंता मोहन पवार, पाणीपुरवठा अभियंता बनसोडे, जिल्हा परिषद बांधकाम अभीयंता शिवाजी राठोड पोलीस निरीक्षक आयलाने , बी डी जाधव , तालुका कृषी अधिकारी कासराळे, तलाठी गाढे पाटील, भुमेश्वर विभूते यासहविविध विभाग प्रमुख उपस्थित होते. अनेक भागांत पूर परिस्थिती निर्माण झाली.



सकाळ पासून आपण स्वतः , तहसीलदार मुख्याधिकारी व प्रशासकीय यंत्रणा अनेक भागात गेलो. अडचणीत सापडलेल्यांना मदत केली जात आहे. प्रशासन आपल्या सोबत आहे, काही अडचण असेल तर मला कधीही कॉल करावा. तसेच नागरिकांनी कामा शिवाय घरा बाहेर पडू नये प्रशासनाच्या सुचनांचे चालन करावे असे आवाहन प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले आहे. शनिवारी (ता. २७ सप्टें) मध्य पहाटे पासून जिल्ह्यासह लोहा-कंधार तालुक्यात भागात मुसळधार पाऊस झाला. अश्या पावसातही स्वतः आमदार चिखलीकर यांनी पूरग्रस्त भागात जाऊन लोकांना धीर दिला मदत केली.


आमदार चिखलीकरांची धो धो पावसात गावांना भेटी
जिल्हयात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे .शनिवारी भल्या पहाटे पासून लोहा कंधार तालुक्यासह जिल्ह्याच्या अनेक भागात जोरदार मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे सकाळीच अनेक गावात पुर परिस्थिती उदभवली काही गावांचे संपर्क तुटले शिवाय शनिवारी दुपारी पुन्हा पावसाचा जोर वाढलाआहे .प्रशासन खबरदारी घेत आहे. आमदार चिखलीकर व अधिकारी पूरग्रस्त भागात गेले धो धो पावसातच जाऊन नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. काही ठिकाणी लोकांचे स्थलांतर केले पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. असा परिस्थितीत लोहा – कंधार सह जिल्ह्यातील नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये आम्ही सोबत आहोत. काहीही समस्या असेल तर कळवावे असे आवाहन आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले.
तलाठी मदतीला धावले
सकाळी सोनखेड भागात पुरात अडकलेल्या व्यक्तीला काढण्यासाठी तहसीलदार परळीकर व टीम निघाली पण जुन्या लोह्यातील पूरपरिस्थिती पाहण्यासाठी ते कलाल पेठ भागत आले. पुरातून दूध घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या मदतीला लोह्याचे तलाठी नारायण गाढे पाटील, श्री सुनगीन्डवार,श्री मुंडे हे मदतिला धावले व सुरळीत किनारी आणले यावेळी माधव काकडे सोबत होते.
तहसीलदार -मुख्याधिकारी सतर्क: पदाधिकारी पूरग्रस्त भागात
लोहा शहरात व तालुक्यात उदभवलेल्या पुराची परिस्थिती जाणून घेण्यासाठी सकाळीच तहसीलदार परळीकर हे अनेक भागात गेले जुन्या शहरात उदभवलेल्या पुराची पाहणी केली. मुख्याधिकारी यांना सूचना दिल्या .तर सकाळ पासूनच मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना पूरग्रस्त भागात ड्युटीला लावले ते स्वतः गेले. त्यांनी लोकांना सुरक्षित ठिकाणी राहण्यासाठी सूचना दिल्या. या दोन्ही अधिकाऱ्यांची टीम सतर्क होती एसडीएम श्री गोरे पोलीस निरीक्षक आयलाने हे परिस्थीवर लक्ष ठेवून होते. शहरात पुराची परिस्थिती निर्माण झाली त्या भागात माजी नगराध्यक्ष किरण वट्टमवार उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम, माजी उपनगराध्यक्ष शरद पाटील, छत्रपती धुतमल,भास्कर पाटील, संभाजी चव्हाण, पंचशील कांबळे, बालाजी खिल्लारे करीम शेख, अनिल धुतमल यासह अनेकजणी लोकांची विचारपूस करत धीर दिला.
पेनूर आष्टुर सावरगाव मार्ग ठप्प ; बसस्थाकातून चारशे फेऱ्या रद्द
लोह्यातून पेनूर ,आष्टुर, सावरगाव या भागात जाणार मार्ग सकाळ पासूनच पुरामुळे बंद झाला. लोक तिकडून शहरात येत नव्हते तर शहरातून त्या गावाकडे जाता येत नव्हते एवढे पाणी रस्त्यावर वाहत होते. लोहा बसस्थाकातून पुणे मुंबई नागपूर कोल्हापूर असा वेगवेगळ्या भागात जाणाऱ्या जवळपास चारशे फेऱ्या रद्द झाल्या कंधार नांदेड व नांदेड लातूर असा बसेस सुरु होत्या. त्यामुळे प्रवाशांची अडचण झाली पण अतिवृष्टीमुळे लोकानी घरात राहणे पसंत केले.


