नांदेडलाइफस्टाइल

Hand Wash Day : हात धुवा दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी केली जनजागृती -NNL

नांदेड| लोहा तालुक्यातील मारतळा येथे जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेच्या वतीने जागतिक हात धुवा दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी गावात जनजागृती कार्यक्रम राबवला.

15 ऑक्टोबर 2024 रोजी डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या आवाहनानुसार विद्यार्थ्यांनी आठवडी बाजारात जाऊन हात धुण्याच्या योग्य पद्धतींबद्दल माहिती दिली.

वेदिका शंकर गिरी, चैतन्या आनंदा ढेपे, सोनाक्षी कामाजी भोंग, नंदिनी सुभाष ढगे, स्वरा राजू पुणेबोईनवाड, सोहम परशुराम सोरटे, आदित्य उबाळे, सोहम शिंदे आदी विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिके सादर केली. गावकऱ्यांनी यामध्ये सहभाग घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या प्रसंगी भास्कर पाटील ढगे, ग्रामसेवक पुंड, मुख्याध्यापक रवी ढगे व इतर गावकरी उपस्थित होते.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!