Wednesday, May 13

Tag: Students created public awareness on

Hand Wash Day : हात धुवा दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी केली जनजागृती -NNL

Hand Wash Day : हात धुवा दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी केली जनजागृती -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| लोहा तालुक्यातील मारतळा येथे जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेच्या वतीने जागतिक हात धुवा दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी गावात जनजागृती कार्यक्रम राबवला. 15 ऑक्टोबर 2024 रोजी डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या आवाहनानुसार विद्यार्थ्यांनी आठवडी बाजारात जाऊन हात धुण्याच्या योग्य पद्धतींबद्दल माहिती दिली. वेदिका शंकर गिरी, चैतन्या आनंदा ढेपे, सोनाक्षी कामाजी भोंग, नंदिनी सुभाष ढगे, स्वरा राजू पुणेबोईनवाड, सोहम परशुराम सोरटे, आदित्य उबाळे, सोहम शिंदे आदी विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिके सादर केली. गावकऱ्यांनी यामध्ये सहभाग घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या प्रसंगी भास्कर पाटील ढगे, ग्रामसेवक पुंड, मुख्याध्यापक रवी ढगे व इतर गावकरी उपस्थित होते....
error: Content is protected !!