नांदेडलाइफस्टाइल

child marriage : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली महिला व बाल विकास विभागास बालविवाह रोखण्यात यश

नांदेड| नांदेड जिल्ह्यात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली बालविवाहमुक्त भारत 100 दिवस अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत नांदेड शहरातील 16 वर्षीय बालिकेचा बालविवाह होणार असल्याची गोपनीय माहिती चाईल्ड लाईन 1098 या टोल फ्री क्रमांकावर प्राप्त झाली.

सदर तक्रार प्राप्त होताच जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी गणेश वाघ यांच्या आदेशानुसार जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे संदीप फुले तसेच चाईल्ड हेल्प लाईनचे कर्मचारी ऐश्वर्या शेवाळे व दिपाली हिंगोले यांनी तात्काळ संबंधित बालिकेच्या घरी भेट देऊन कारवाई केली. यावेळी बालिकेच्या आई व नातेवाईकांचे समुपदेशन करण्यात आले. तसेच बालिकेच्या वयाची खातरजमा करून बालविवाहाचे दुष्परिणाम व बालविवाह प्रतिबंधक अधिनियम, 2006 याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

बालविवाह हा कायद्याने गुन्हा असल्याचे पालकांना स्पष्टपणे समजावून सांगण्यात आले. बालिकेच्या काळजी व संरक्षणाच्या दृष्टीने तिला बाल कल्याण समिती, नांदेड यांच्यासमोर हजर करण्यात आले. तसेच पालकांकडून बालविवाह न करण्याबाबत लेखी हमीपत्र घेण्यात आले असून, या तत्पर कारवाईमुळे सदर बालविवाह यशस्वीपणे रोखण्यात आला आहे.

बालविवाहाची कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ शहरी भागात बाल विकास प्रकल्प अधिकारी, ग्रामीण भागात ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, तसेच चाईल्ड हेल्प लाईन 1098 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, जेणेकरून भविष्यात अशा अनिष्ट प्रथा रोखता येतील, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button