Friday, June 26

Tag: of District Collector Rahul Kardile

child marriage : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली महिला व बाल विकास विभागास बालविवाह रोखण्यात यश

child marriage : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली महिला व बाल विकास विभागास बालविवाह रोखण्यात यश

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| नांदेड जिल्ह्यात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली बालविवाहमुक्त भारत 100 दिवस अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत नांदेड शहरातील 16 वर्षीय बालिकेचा बालविवाह होणार असल्याची गोपनीय माहिती चाईल्ड लाईन 1098 या टोल फ्री क्रमांकावर प्राप्त झाली. सदर तक्रार प्राप्त होताच जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी गणेश वाघ यांच्या आदेशानुसार जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे संदीप फुले तसेच चाईल्ड हेल्प लाईनचे कर्मचारी ऐश्वर्या शेवाळे व दिपाली हिंगोले यांनी तात्काळ संबंधित बालिकेच्या घरी भेट देऊन कारवाई केली. यावेळी बालिकेच्या आई व नातेवाईकांचे समुपदेशन करण्यात आले. तसेच बालिकेच्या वयाची खातरजमा करून बालविवाहाचे दुष्परिणाम व बालविवाह प्रतिबंधक अधिनियम, 2006 याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. बालविवाह हा कायद्याने गुन्हा असल्याचे पालकांना स्पष्टपणे समजावून सांगण्या...
Nanded flight service : नांदेड विमानसेवा दोन दिवसांत सुरु होणार – जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांचा पुढाकार

Nanded flight service : नांदेड विमानसेवा दोन दिवसांत सुरु होणार – जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांचा पुढाकार

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड (प्रतिनिधी) मागील महिन्यात धावपट्टी खराब झाल्याने बंद पडलेली नांदेड विमानसेवा येत्या दोन दिवसांत पुन्हा सुरू होणार आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी केंद्र व राज्यातील वरिष्ठ अधिकार्‍यांशी सातत्याने संपर्क ठेवून अल्पावधीतच धावपट्टीचे काम पूर्ण करून घेतले आहे. विमान प्राधिकरणाने चाचणी करून विमानसेवा सुरू करण्यास हिरवा कंदील दाखविला आहे. नांदेड विमानतळावरून पूर्वी बेंगळुरू, हैद्राबाद, अहमदाबाद, पुणे, पंजाब अशा ठिकाणी विमानसेवा सुरू होती. मात्र दोन महिन्यांपूर्वी धावपट्टी खराब झाल्याने एका विमानाला हवेत भरकटावे लागले होते. अहमदाबाद विमान दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर देशभरातील विमानतळांची पाहणी करण्यात आली होती. त्यात नांदेडच्या धावपट्टीची दुरुस्ती होईपर्यंत सेवा थांबविण्याची शिफारस प्राधिकरणाने केली होती. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कर्डीले यांनी कोणताही गाजावाजा न करता प्रभा...
error: Content is protected !!