Friday, June 26

Tag: and Child Development Department has succeeded

child marriage : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली महिला व बाल विकास विभागास बालविवाह रोखण्यात यश

child marriage : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली महिला व बाल विकास विभागास बालविवाह रोखण्यात यश

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| नांदेड जिल्ह्यात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली बालविवाहमुक्त भारत 100 दिवस अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत नांदेड शहरातील 16 वर्षीय बालिकेचा बालविवाह होणार असल्याची गोपनीय माहिती चाईल्ड लाईन 1098 या टोल फ्री क्रमांकावर प्राप्त झाली. सदर तक्रार प्राप्त होताच जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी गणेश वाघ यांच्या आदेशानुसार जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे संदीप फुले तसेच चाईल्ड हेल्प लाईनचे कर्मचारी ऐश्वर्या शेवाळे व दिपाली हिंगोले यांनी तात्काळ संबंधित बालिकेच्या घरी भेट देऊन कारवाई केली. यावेळी बालिकेच्या आई व नातेवाईकांचे समुपदेशन करण्यात आले. तसेच बालिकेच्या वयाची खातरजमा करून बालविवाहाचे दुष्परिणाम व बालविवाह प्रतिबंधक अधिनियम, 2006 याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. बालविवाह हा कायद्याने गुन्हा असल्याचे पालकांना स्पष्टपणे समजावून सांगण्या...
error: Content is protected !!