श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे। माहुर तालुक्यातील सिंदखेड पोलीस ठाण्याची ईमारत सन १९१८ मध्ये निजामशाही च्या काळात बांधण्यात आलेली आहे.१०६ वर्षापूर्वीची ही ईमारत आता जिर्ण झाली असुन या ईमारतीचे छञ पावसाळ्यात नेहमी गळते.ईतर वेळी या छताचे पाेपडे, मातीचे गोळे खाली पडतात,या ईमारतीत केव्हाही दुर्घटना होण्याची शक्यता असल्याने, पोलीस प्रशासनाच्या ताब्यात असलेल्या वाई बाजार येथील मालमत्ता क्र.१०५ मधील १ हे २० आर म्हणेज जवळपास ३ एक्कर असलेल्या मोकळ्या जागेत सिंदखेड पोलीस स्टेशनचे स्थांलातर करण्याची मागणी सिंदखेड पोलीस स्टेशन हद्दीतील नागरीकांनी केली आहे.


ग्रामीण भागातील कायदा व सुव्यस्था सांभाळण्याचे एक प्रमुख केंद्र असलेल्या सिंदखेड पोलीस ठाण्याची इमारत १०६ वर्षांची झाली असून ती इमारत आता भग्नावस्था व जीर्णावस्थेमुळे आता अखेरची घटका मोजत आहे. असे असले तरी अनेकदा या बाबीवर माध्यमांनी पण प्रकाश टाकल्यानंतर कोणतीही सुधारणा झाली नाही , केवळ महिला कर्मचाऱ्यासाठी एक महिला विश्रांती कक्ष उभारण्यात आले आहे.माञ त्याच जिर्ण स्थितीत असलेल्या इमारतीत दिवस ढकलत ज्यांचे ब्रीद वाक्य “सदरक्षणाय, खलनिग्रहनाय” असलेल्या पोलीस बंधूना स्वतःचा जीवरक्षणाय चा नारा देत जीव मुठीत धरून कर्तव्य बजावावे लागत असल्याचे भीषण वास्तव आमच्या प्रस्तुत प्रतिनिधींनी नुकतीच सिंदखेड पोलीस ठाण्यास सदिच्छा भेट दिली असता निदर्शनास आले आहे.



पावसाळ्याच्या दिवसात पोलीसांव्दारे छतावर मेनकापड टाकुन पाणी गळण्या पासुन रोखण्याचे केवीलवाना प्रयत्न केले जाते,तरीही ठिकठिकानी पाणी गळतेच या ईमरतीत अनेक ईलेक्टाँनिक जसे संगणक,सी.सी.टीव्ही यंञणा,मालखाना,बंदुकासह विविध महत्वाचे दस्तावेज आहेत,हे साहीत्य सुरक्षित ठेवण्यास पोलीसांना बरीच कसरत करावी लागते.वर्षातुन दोनदा जिल्हा पोलीस अधिक्षक आणि इतर अधिकार्याकडून पोलीस ठाण्याचे निरक्षण होते, तसेच पोलीस ठाण्याकडुन जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयाला वेळीवेळी प्रस्ताव पाठविण्यात येत असतात.वरीष्ठाकडून या बाबत कारवाई सुरु असल्याची माहिती दिली जाते,माञ अद्याप या बाबत ठोस पाउले उचलून व पाठपुरावा केला जात नसल्याने पोलीसासह कायदा व सुव्यवस्था प्रेमींमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.




