Sindkhed Police : सिंदखेड पोलीसांचा १०६ वर्षाच्या ईमारतून ५२ गावांचा कारभार -NNL
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे। माहुर तालुक्यातील सिंदखेड पोलीस ठाण्याची ईमारत सन १९१८ मध्ये निजामशाही च्या काळात बांधण्यात आलेली आहे.१०६ वर्षापूर्वीची ही ईमारत आता जिर्ण झाली असुन या ईमारतीचे छञ पावसाळ्यात नेहमी गळते.ईतर वेळी या छताचे पाेपडे, मातीचे गोळे खाली पडतात,या ईमारतीत केव्हाही दुर्घटना होण्याची शक्यता असल्याने, पोलीस प्रशासनाच्या ताब्यात असलेल्या वाई बाजार येथील मालमत्ता क्र.१०५ मधील १ हे २० आर म्हणेज जवळपास ३ एक्कर असलेल्या मोकळ्या जागेत सिंदखेड पोलीस स्टेशनचे स्थांलातर करण्याची मागणी सिंदखेड पोलीस स्टेशन हद्दीतील नागरीकांनी केली आहे.
ग्रामीण भागातील कायदा व सुव्यस्था सांभाळण्याचे एक प्रमुख केंद्र असलेल्या सिंदखेड पोलीस ठाण्याची इमारत १०६ वर्षांची झाली असून ती इमारत आता भग्नावस्था व जीर्णावस्थेमुळे आता अखेरची घटका मोजत आहे. असे असले तरी अनेकदा या बाबीवर माध्यमांनी पण प्रक...
