नवीन नांदेड l सद्गुरू शिवाचार्य सेवाभावी संस्था सिडको व समस्त सदभक्त ,श्री गुरू कृपा निवासी कोचिंग क्लासेस यांच्या वतीने गुरुदेव पुरस्कार वितरण व सत्संग सोहळा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजन रविवार, दि.१९ जानेवारी २५ सकाळी ११ वाजता गोविंद गार्डन मंगल कार्यालय, पाण्याच्या टाकीजवळ, हडको, नविन नांदेड येथे आयोजन करण्यात आला आहे.

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या कृपाशिर्वादाने दरवर्षी कर्तुत्ववान, सन्माननीय व्यक्तीमत्वाचा गुरुदेव पुरस्कार देवून गौरव केला जातो,याही वर्षी गुरुदेव पुरस्कार वितरण, गुणवंत विद्यार्थी सत्कार व गुरुवर्यांचा सत्संग सोहळा संपन्न होणार आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष वेदांताचार्य, युवासंत ष.ब्र.१०८दिगंबर शिवाचार्य महाराज थोरला मठ, वसमतनगर,तर प्रमुख मार्गदर्शक प.पु. आचार्य गुरुराज स्वामी महाराज भक्तीस्थळ अहमदपूर,व उद्घाटक प्रा.मनोहरराव धोंडे,शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटना संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष हे राहणार आहेत.

गुरुदेव जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी माहेश्वरमुर्ती सद्गुरु विरभद्रेश्वर महाराज येलुरकर (वर्ष २०२०) ह.भ.प.गोदावरीताई मुंढे गंगाखेडकर (सुप्रसिद्ध गायिका) (वर्ष २०२१) शि.भ.प. मारोतराव नळगे खेडकर वाडीकर (वर्ष २०२२) एस.एल.माचलोड (सेवानिवृत्त मुख्याध्यापक) (वर्ष २०२३) शि.भ.प. सोनबा गुरुजी शिराळे (माजी शिक्षण विस्तार अधिकारी) (वर्ष २०२४)डॉ. हंसराज वैद्य नांदेड यांना देण्यात येणार आहे.

या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य सेवाभावी संस्था, सिडको, नांदेड व समस्त सद्भक्त मंडळी, सिडको,नविन नांदेड ,श्री गुरुकृपा निवासी कोचिंग क्लासेसचे शिरोळे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
