नवीन नांदेड l शासकीय रेखाकला ग्रेड परीक्षा एलिमेंटरी, निकाल जाहीर झाला असून जिल्हा परिषद उच्च.प्राथमिक शाळा जवाहरनगर,तुप्पा शाळेचा १००% निकाल लागला असुन
शासकीय चित्रकला परीक्षेत शाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले आहे.

या परिक्षेत्र कु.श्रद्धा गायकवाड, प्रथम अ श्रेणी, कु.ऋतुजा नल्लेवाड, कु. नागनाथ कराळे, द्वितीय ब श्रेणी, तर विशाखा लांडगे, प्रतिक्षा शिंदे, दुर्गा कांबळे, श्रद्धा गोरे, हर्षद कसबे, विनायक पांचाळ, याने क श्रेणीत विशेष प्राविण्य मिळवले.

विद्यार्थ्यांना अंशकालीन कला शिक्षक श्रीरंग स्वामी यांचे मार्गदर्शन लाभले,यशस्वीतांचे मुख्याध्यापक बळीराम राठोड, आंनद पवार, उत्तम कांबळे,समदानी शेख ,सुनिल मोटरगे ,बालाजी सोनवणे,मोहन कुलकर्णी,जगन्नाथ पवार,गुणाजी भवर, श्रीमती उज्जवला चालीकवार, श्रीमती मिरा कोलेवाड,श्रीमती वृंदा भोसले,श्रीमती सारिका औरादकर,व शिक्षकवृंदानी कौतुक करून अभिनंदन केले.
