नवीन नांदेड l जनता शिक्षण प्रसारक मंडळ उमरदरी संचलित शिवाजी विद्यालय,सिडको, नांदेड या शाळेच्या वतीने इयत्ता पाचवी ते सातवीच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले होते. शिवाजी विद्यालय,सिडको,नांदेड हे विद्यालय नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी नांदेड जिल्हयात नेहमी अग्रेसर असते.

यावर्षी सदरील सहलीं अतर्गत विद्यार्थ्यांनी दि.१६ ते १७ जानेवारी २०२५ दरम्यान नाथ सागर जलाशय सह पर्यटनाची राजधानी म्हणून नावाजलेल्या छत्रपती संभाजी नगरमध्ये अनेक जगप्रसिद्ध मंदिरं,शिल्प आणि इतिहासाचा वारसा सांगणाऱ्या वास्तुंना भेटी दिल्या.

विद्यार्थ्यांनी संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव जाधव ,उपाध्यक्ष रवि जाधव यांच्या मार्गदर्शना खाली सहल काढण्यात आली, सहल नियोजनासाठी प्राचार्य साहेबराव देवरे,पर्यवेक्षक विकास पाटील,
सह शिक्षिका सौ.के.पी.पल्लेवाड, जी.ए.जाधव, एस.के.अनकाडे, एस.के.जाधव, एन.पी.जाधव, सी.जी.पावडे, आर.के.चंदनशीवे, सौ.व्ही.यू.भाले व गजानन सुरेवाड यांनी परिश्रम घेऊन शैक्षणिक सहल यशस्वी रित्या पार पाडली.
