मूल्य साखळी विकास योजनेअंतर्गत महाडीबीटी पोर्टलवर 6 ऑगस्ट पर्यत अर्ज करण्याचे आवाहन -NNL

नांदेड| सोयाबीन व इतर तेलबिया आधारित पीक पद्धतीस चालना देऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी सोयाबीन व इतर तेलबिया पिकातील मूल्य साखळीस चालना देण्यासाठी राज्य पुरस्कृत एकात्मिक सोयाबीन आणि इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मुल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना सन 2022-23 ते 2024-25 या तीन वर्षात राबविण्यात येत आहे. योजनेंतर्गत सन 2024-25 मध्ये चालू खरीप हंगामामध्ये निविष्ठा 100 टक्के अनुदानावर पुरविण्यात येणार आहेत. मागील 10 दिवसापासुन अर्ज करण्याची प्रक्रिया पोर्टलवर सुरू असुन सद्यस्थितीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अर्जाची संख्या कमी प्रमाणात असल्याने 6 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.

शंभर टक्के अनुदानावर बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप
बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप शंभर टक्के अनुदानावर लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलवर केलेल्या अर्जातून ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी mahadbt.maharashtra.gov.in – farmer login या वेबसाईटवर 6 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करावेत व या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.

अर्ज करणेची पध्दत mahadbt.maharashtra.gov.in – farmer login लाभार्थी शेतकरी यांचे युजर आयडी व पासवर्ड टाकावा, अर्ज करा बाबीवर क्लिक करणे, कृषि यांत्रिकीकरण, बावी निवडा यावर क्लिक करणे, मुख्य घटक बाबीवर क्लिक करणे, कृषि यंत्र औजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य, तपशिल बाबीवर क्लिक करून, मनुष्यचलीत औजारे घटक निवडणे, यंत्र/औजारे व उपकरणे बाबीवर क्लिक करून, पिक संरक्षण औजारे निवडणे, मशीनचा प्रकार बाबीवर क्लिक करून बॅटरीसंचलीत फवारणी पंप (गळीतधान्य) निवडणे जतन करा याप्रमाणे आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button