भोकर| जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके, नोडल अधिकारी, डॉ. हनुमंत पाटील, जिल्हा मौखिक आरोग्य अधिकारी डॉ.कांतीलाल इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच ग्रामीण रुग्णालय भोकर येथील वैद्यकीय अधिक्षक डॉ.प्रताप चव्हाण सर यांच्या निरीक्षणाखाली ग्रामीण रुग्णालय भोकर येथे ” जागतिक कर्करोग दिन ” साजरा करण्यात आला.

यावेळी दंत शल्य चिकित्सक डॉ. मायादेवी नरवाडे यांनी बाह्य रुग्ण विभागात आलेल्या रुग्णांना मौखिक कर्करोगाविषयी माहिती दिली त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना सांगितल्या तसेच या वर्षाचे घोष वाक्य ” Unity for Unique ” म्हणजेच ” एकजूट होऊ या व कर्करोगाला हरवू या ” ही घोषवाक्य सांगितले व सर्व रुग्णांची मौखिक तपासणी केली.

यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. अस्मिता भालके मॅडम, एनसीडी वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर रेड्डी, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी बालाजी चांडोलकर, औषध निर्माण अधिकारी शिवप्रसाद जाधव, दंत सहाय्यक करण शिंदे, एनसीडी समुपदेशक रेणुका भिसे, भालेराव सिस्टर, श्रीमती करंडेकर आदी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
