four-faced Ganesha idol : एक दुर्मीळ व प्राचीन चतुरमुखी गणेश मूर्ती माहूर येथे खोदकामादरम्यान आढळून आली

चतुरमुखी गणेश मूर्ती म्हणजेच चार मुख असलेली गणपतीची मूर्ती, ही एक दुर्मीळ व विशेष धार्मिक महत्वाची रूप आहे. या प्रकारातील गणपतीला चार तोंडे असतात आणि ती चार दिशांकडे पाहणारी असतात. या मूर्तीला “चतुर्मुख गणपती” असेही म्हणतात.
नांदेड| एक दुर्मीळ व प्राचीन चतुरमुखी गणेश मूर्ती नुकतीच माहूर स्थानिक खोदकामादरम्यान आढळून आली आहे. चार मुखांची ही अद्भुत मूर्ती पाहण्यासाठी परिसरातील नागरिक, भक्त, आणि पुरातत्त्वप्रेमींनी गर्दी केली आहे. अनेकांनी हे दैवी चिह्न समजत पूजा-अर्चा सुरू केली आहे. या घटनेची छायाचित्रे व व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.


नांदेड जिल्ह्यातील माहूर शहरातील पौराणिक भोजंता तलावा शेजारी असलेल्या पुरातन भगवान शिव शंकराच्या मंदिरा च्या पायथ्याशी पावसामुळे एक दगड वर आलेले काही नागरिकांना दिसले असता त्यांनी तेथे कुतूहलापोटी खोदकाम केले. त्या खोदकामात चतुर्थ मुखी पौराणिक गणेश मूर्ती दिसल्याने नागरिकांनी या मूर्तीची शिव मंदिराच्या ओट्यावर प्राणप्रतिष्ठा करून स्थापना केल्याने या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली आहे.

माहूर शहर हे पौराणिक ऐतिहासिक शहर असल्याने येथे कुठेही खोदकाम केले असता पुरातन वस्तू सापडतात येथे अनेक ठिकाण पौराणिक तर किल्ल्यासह इतर वास्तू ऐतिहासिक असल्याने पर्यटक आकर्षित होत आहेत शहरातील शेवटचे टोक म्हणून श्री देव देवेश्वर संस्थांनच्या मालकीच्या असलेल्या चक्रधर स्वामी यांचे पदस्पर्शाने पावन झालेल्या भोजंता तलावा च्या शेजारी माहूर शहराच्या शिवे अंतर्गत असलेल्या 12 शिव मंदिरापैकी एक पौराणिक शिव मंदिर आहे या मंदिरात दररोज नागरिक नित्यनेमाने पूजाअर्चा करतात येथे दर्शनासाठी आलेले नागरिक झाडाखाली विसावाही घेतात वयोवृद्ध भाविक प्रदक्षिणा करत असतात यावर्षीच्या पावसामुळे शिव मंदिराच्या ओट्याखाली असलेल्या जागेत एका दगड वर आलेले दिसले त्यामुळे काही नागरिकांनी कुतूहलापोटी येथे खोदकाम करून बघितले असता त्यांना चतुरमुखी गणेश मूर्ती आढळून आली.



चतुर्थी गणेशाची मूर्ती सापडल्याची वार्ता शहरात पसरतात हजारो भाविकांनी येथे दर्शनासाठी गर्दी केल्याने पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी सादर ठिकाणची पाहणी करून येथील सुरक्षा वाढविली आहे. तर सदरील शिवमंदिरावर छत नसल्याने उघडेच आहे त्यामुळे भाविकांनी येथे तात्काळ मंदिराची उभारणी साठी संकल्प करून पुरातन विभागाच्या परवानगीने कामास सुरुवात होणार आहे.

चतुरमुखी गणेश मूर्तीचे विशेष महत्त्व:
चार तोंडे – चार वेगवेगळ्या दिशांमध्ये पाहणारी, जी चार वेगवेगळ्या शक्ती व गुणांचे प्रतीक असतात:
पूर्वमुख – ज्ञानाचे व आध्यात्मिकतेचे प्रतीक
पश्चिममुख – समृद्धी व संपत्तीचे प्रतीक
उत्तरमुख – शांतता व प्रसन्नतेचे प्रतीक
दक्षिणमुख – शक्ती व रक्षणाचे प्रतीक
ब्रह्मा, विष्णु, महेश आणि गणेश यांचे एकत्र स्वरूप – काही पौराणिक कथा सांगतात की चतुर्मुख गणपती म्हणजे विविध दैवी शक्तींचा संगम आहे. प्रत्येक मुख वेगवेगळ्या भावनेचे व क्रियेचे प्रतिनिधित्व करते, उदा. क्रोध, करुणा, हसू, शांती.
ध्यानयोगात उपयोगी – चतुरमुखी गणपतीची पूजा ध्यान व साधनेसाठी अत्यंत लाभदायक मानली जाते.
भारतात अशा प्रकारच्या मूर्ती फारशा आढळत नाहीत, परंतु रांजणगाव गणपती (महाराष्ट्र) येथे प्राचीन चतुर्मुखी गणपतीची मूर्ती गुप्त कपाटात असल्याचा उल्लेख आहे. काही तांत्रिक साधक किंवा शैव-शाक्त परंपरेतील मंडळांमध्ये ही मूर्ती ध्यानासाठी वापरली जाते.



