नांदेड l अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषद व्यापारी आघाडी नांदेड जिल्हाध्यक्षपदी नारायण ज्ञानदेव अन्नपुरे पुयनीकर यांची निवड करण्यात आली.


विजयनगर तरोडा बु. नांदेड येथे नुकत्याच झालेल्या बैठकीत ही निवड घोषित करण्यात आली तसेच नियुक्तीपत्र देऊन नारायण ज्ञानदेव अन्नपुरे यांचा सत्कार करण्यात आला. लवकरच जिल्ह्य़ातील व्यापाऱ्यांची बैठक घेऊन व्यापारी आघाडीची सविस्तर कार्यकारिणी निवडण्यात येणार असल्याचे नारायण अन्नपुरे यांनी जाहीर केले.


यावेळेस लक्ष्मण व्यंकटराव वाघमारे यांचीही अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेच्या नांदेड उत्तर महानगर अध्यक्षपदी निवड करण्यात आली व त्यांचाही नियुक्तीपत्र देऊन मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला.



ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शिवानंद जोगदंड, दादाराव वाघमारे, कर्मचारी जिल्हाध्यक्ष भीमराव वाघमारे, नांदेड महानगर अध्यक्ष श्रीनिवास कांबळे, हणमंत निंबाळकर, लक्ष्मण हंबर्डे, देविदास टोम्पे, सतीष भालके, साहेबराव ढगे, राजू बनसोडे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.




