four-faced Ganesha idol : एक दुर्मीळ व प्राचीन चतुरमुखी गणेश मूर्ती माहूर येथे खोदकामादरम्यान आढळून आली
चतुरमुखी गणेश मूर्ती म्हणजेच चार मुख असलेली गणपतीची मूर्ती, ही एक दुर्मीळ व विशेष धार्मिक महत्वाची रूप आहे. या प्रकारातील गणपतीला चार तोंडे असतात आणि ती चार दिशांकडे पाहणारी असतात. या मूर्तीला “चतुर्मुख गणपती” असेही म्हणतात.
नांदेड| एक दुर्मीळ व प्राचीन चतुरमुखी गणेश मूर्ती नुकतीच माहूर स्थानिक खोदकामादरम्यान आढळून आली आहे. चार मुखांची ही अद्भुत मूर्ती पाहण्यासाठी परिसरातील नागरिक, भक्त, आणि पुरातत्त्वप्रेमींनी गर्दी केली आहे. अनेकांनी हे दैवी चिह्न समजत पूजा-अर्चा सुरू केली आहे. या घटनेची छायाचित्रे व व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.
नांदेड जिल्ह्यातील माहूर शहरातील पौराणिक भोजंता तलावा शेजारी असलेल्या पुरातन भगवान शिव शंकराच्या मंदिरा च्या पायथ्याशी पावसामुळे एक दगड वर आलेले काही नागरिकांना दिसले असता त्यांनी तेथे कुतूहलापोटी खोदकाम केले. त्या खोदकामात चतुर्थ ...
