नांदेड| भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त 26 जानेवारी रोजी ध्वजारोहणाचा राष्ट्रीय कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमाच्यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यादृष्टीने जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात प्रतिबंधात्मक आदेश (Prohibitory order in Collectorate area) निर्गमीत केले आहेत.

या आदेशान्वये नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्ता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून, श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ते महात्मा गांधी पुतळा ते महावीर चौकापर्यंतच्या परिसरातील मुख्य रोडवर 22 जानेवारी रोजी 00.00 वाजेपासून ते 27 जानेवारी 2025 रोजीचे 24 वाजेपर्यंत उपोषणे, आत्मदहने, धरणे, मोर्चे, रॅली, रास्ता रोको आंदोलने इत्यादी आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्यास भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रतिबंध केले आहे.

निवृत्तीवेतनधारकांसाठी सोमवारी पेन्शन अदालत
महालेखापाल यांच्या अधिनस्त अधिकारी-कर्मचाऱ्यांच्याद्वारे निवृत्तीवेतन धारकासाठी व निवृत्ती वेतन विषयक एजी कार्यालयात होणाऱ्या अडचणीचे निराकरण करण्यात येणार आहे. यादृष्टिने पेन्शन अदालतीचे आयोजन सोमवार 27 जानेवारी 2025 रोजी नियोजन भवन नांदेड येथे करण्यात आले आहे. कार्यालयातील लेखा विषयक कामकाज करणारे कर्मचारी-सेवानिवृत्तीवेतनधारकांनी आपल्या स्तरावर अवगत करावे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
