हदगांव, शेख चांदपाशा| तालुक्यातील मौजे मार्लेगाव या गावाचे पुनर्वसन (Rehabilitation of Marlegaon village) शासनाने सन १९८३ या वर्षात केले होते. अद्यापही त्या पुनर्वसित ग्रामस्थांना नमुना नंबर – ८ मिळत नाही. परिणाम स्वरूप ह्या गावाच्या ग्रामस्थाना इतर कामे करण्यासाठी खुप त्रास सहन करावा लागत आहे. बऱ्याच दिवसापासून हा प्रश्न प्रलंबित असल्याने तो मार्गी लागावा म्हणून दि 10 जाने 2025 च्या विद्यमान आ. बाबुराव कदम कोहळीकर यांच्या जनता दरबार मध्ये हा प्रश्न उपस्थित केल होता. पण त्यास स्थानिय प्रशासनाने केवळ नोद घेतली परंतु कृती काहीच दिसून आली नाही.

मागील आठवड्यात हिगोली लोकसभाचे खा. नागेश पा.आष्टीकर यांनी हदगाव विधानसभा क्षेत्रातील घरकूल व प्रशासकीय कामाचा आढावा संबधी बैठक आयोजित केली होती. यामध्ये माजी आ. माधवराव पा जवळगांवकर (Ex-MLA.Madhavrao Patil Jawalgaonkar) हे यांची उपस्थिती पण विशेष दिसून आली. ह्यावेळी अनेक गावाच्या नागरिक व संरपंच यांनी प्रशासकीय स्तरावर येणा-या आडचणीवर व्यथा मांडल्या होत्या. ह्यामध्ये प्रमुख्याने मार्लेगांव या गावाचे संरपंच प्रतिनिधी आपल्या गावच्या पुनर्वसनाचा मुद्दा उपस्थित करत शासनाने पुनर्वसन करून सुद्धा त्या पूर्ण जमिनीची सातबारा आज पर्यंतही मूळ मालकाच्या नावे असल्याने ग्रामपंचायतचा नमुना नंबर -८ मिळविण्या करिता ह्या गावाच्या ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

माजी आ. जवळगावकर यांनी झालेल्या आढावा बैठकीच्या दुसऱ्याच दिवशी तातडीने सरपंच प्रतिनिधी तथा पोलीस पाटील कदम यांना नांदेड येथे बोलावून जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन गावाच्या पुनर्वसनाच्या प्रश्न आपल्या स्तरावर निकाली निघावा. अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. कयाधु नदीच्या माहापुरामुळे सन 1983 साली शासनाने मारलेगाव या गावाचे संपूर्ण पुनर्वसन केले असून यासाठी शासनाने मार्लेगावच्या सर्व ग्रामस्थांच्या पुनर्वसना साठी एकूण २२ एकर जमीन संपादित केली.

परंतु सदरील जमीन अद्यापही मूळ मालक यांच्याच नावावर आहे, या आधारे मूळ मालकाने जमिनी वर अतिक्रमण करून नागरिकांना देण्यात आलेल्या प्लॉटच्या जमिनीवर ताबा केला असल्याची तक्रारही गावातील ग्रामस्थांनी केली असल्याची माहिती आहे माजी यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी ही गंभीर बाब लक्षात घेऊन जिल्हाधिकारी लवकरच या प्रकरणाची दखल घेतल्याचे दिसून आले अनेक वर्षापासून प्रलंबित मागण्या मार्गी लागेल अश्या अपेक्षा इथल्या गांवक-याच्या दिसून आल्या.
