नांदेड| शालेय विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात प्रचंड मेहनत घेऊन जिद्दीने सोळा -सोळा तास अभ्यास करून जीवनात यशस्वी व्हावे असे प्रतिपादन राज्याचे पूर्व शिक्षण संचालक शिक्षण तज्ञ डॉक्टर गोविंद नांदेडे (Education expert Dr. Govind Nandede) यांनी केले.

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा नाळेश्वर येथे राज्याचे पूर्व शिक्षण संचालक डॉक्टर गोविंद नांदेडे, राज्याचे माजी सनदी अधिकारी सिने अभिनेते अनिल मोरे, यशवंत विद्यालयाचे संस्थाचालक रंगनाथ पाटील वाघ यांनी सदिच्छा भेट दिली असता झालेल्या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पुढे डॉक्टर गोविंद नांदेडे म्हणाले की, ग्रामीण भागातील विद्यार्थी अतिशय जिद्दी व मेहनतीने पुढे जातआहेत. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा नाळेश्वर येथील विद्यार्थी क्रीडा स्पर्धेत विभागीय स्तरापर्यंत यशस्वी झाल्याबद्दल त्यांचे कौतुक करून पुढे अशीच मुले फ्रान्स, अमेरिका, जपान इंग्लंड सह अनेक देशात भारताचे नेतृत्व करतील अशी अपेक्षा व्यक्त केली.

सिने अभिनेते तथा राज्याचे माजी सनदी अधिकारी अनिल मोरे यांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक करून शाळेतील स्वच्छता गुणवत्ता व इतर उपक्रमांचे कौतुक केले. यावेळी शाळेचे पदोन्नत मुख्याध्यापक पंडित कदम सर यांनी प्रास्ताविकात शाळेविषयीची माहिती सांगितली. शाळेचे पदवीधर शिक्षक संजय कोठाळे यांनी शाळेत चालत असलेल्या सर्व उपक्रमांची माहिती देऊन प्रस्तुत शाळेला गावकऱ्यांचे व पालकांचे सहकार्य असल्याचे सांगितले. यावेळी शाळेच्या सहशिक्षिका असो मांजरमकर एस. ए. , सौ केंद्रे एन. पी. यांचे सह शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
