HomeनांदेडPalaspan : पळसपान स्नेहसंमेलनात बहारदार सादरीकरण — कलागुणांनी प्रेक्षकांची जिंकली मने

Palaspan : पळसपान स्नेहसंमेलनात बहारदार सादरीकरण — कलागुणांनी प्रेक्षकांची जिंकली मने

नांदेड| शनिवारची गार कातरवेळ आणि उत्साहाने भारलेले वातावरण… स्वामी रामानंद तीर्थ यांच्यासह अनेक स्वातंत्र्यसैनिक व समाजसेवकांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नांदेडच्या भूमीत नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवी ‘पळसपान’ वार्षिक स्नेहसंमेलनाचा सोसायटीच्या खुल्या मंचावर उत्साहात समारोप झाला. प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बहारदार सादरीकरणाने उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.

चौथ्या पळसपान स्नेहसंमेलनाचे उद्घाटन सोसायटीच्या सदस्या सौ. अनुजा डोईफोडे यांच्या हस्ते झाले. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध उद्योगपती अलीभाई पंजवानी होते. या वेळी सोसायटीचे अध्यक्ष डॉ. व्यंकटेश काब्दे, उपाध्यक्ष सीए डॉ. प्रवीण पाटील, सचिव सौ. श्यामल पतकी, सहसचिव अॅड. प्रफुल्ल अग्रवाल, सदस्य अॅड. प्रदीप नागापूरकर, नौनिहालसिंग जहागीरदार, दीपनाथ पत्की आदी मान्यवर उपस्थित होते. या स्नेहसंमेलनाची संकल्पना सीए डॉ. प्रवीण पाटील यांची होती.

सोसायटी अंतर्गत पीपल्स कॉलेज, सायन्स कॉलेज व पीपल्स हायस्कूल मधील प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी गीतगायन, काव्यवाचन, नृत्य, एकपात्री अभिनय, वेशभूषा सादरीकरण अशा विविध कलाप्रकारांद्वारे आपले कलागुण बहारदार कलाप्रदर्शन सादर केले.

मुख्याध्यापक नितीन सेलमोकर यांच्या गीताला दाद मिळाली, तर विश्वास अंबेकर यांच्या भक्तिगीताला नौनिहालसिंग जहागीरदार यांनी तबल्यावर साथ देत भक्तिमय वातावरण निर्माण केले. सौ. अनिता गुंडेवार यांच्या नृत्याने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले, तर विश्वास अंबेकर यांच्या एकपात्री अभिनयातून सामाजिक संदेश देण्यात आला.

f1078f08 9553 40f2 b7ce c73aedecedc2 Palaspan : पळसपान स्नेहसंमेलनात बहारदार सादरीकरण — कलागुणांनी प्रेक्षकांची जिंकली मने

सौ. अनिता सुरोशी यांनी साकारलेली ‘स्वराज्याची जननी जिजाऊ’ ही भूमिका प्रभावी ठरली. प्रतीक्षा सुर्वे यांच्या ‘व-हाड निघालं लंडनला’ या विनोदी एकपात्री अभिनयाला टाळ्यांचा कडकडाट झाला, तर स्नेहा गायकवाड यांच्या लावणीने संमेलनाची रंगत वाढवली.

काव्यमैफलीतसीए डॉ. प्रवीण पाटील, डॉ. रेखा वाडेकर, प्रा. तुकाराम बोईनवाड, श्यामसुंदर गोरे, डॉ. विनोद चव्हाण, डॉ. प्रीती यादव, अनिता सुरोशे, दत्ता गच्चे, स्मिता चालीकवार यांनी हृदयस्पर्शी कवितांचे सादरीकरण केले. डॉ. दत्ता गच्चे आणि मनोहर राठोड यांच्या जोशपूर्ण सादरीकरणाने उपस्थित श्रोतेही नृत्यात सामील झाले.

1890c359 6160 4008 b3bf 62da431dea17 Palaspan : पळसपान स्नेहसंमेलनात बहारदार सादरीकरण — कलागुणांनी प्रेक्षकांची जिंकली मने

कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले व स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमापूजनाने झाली. मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ट प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार प्रदान करण्यात आले. सन्मानित मान्यवर मध्ये डॉ. विकास सुकाळे — वरिष्ठ महाविद्यालय, पीपल्स कॉलेज, डॉ. राजेश सोनकांबळे — कनिष्ठ महाविद्यालय, पीपल्स कॉलेज, वामन कुलकर्णी — शिक्षकेतर कर्मचारी, पीपल्स कॉलेज, डॉ. संगिता मोदी — वरिष्ठ महाविद्यालय, सायन्स कॉलेज, प्रा. मारोती डुरके — कनिष्ठ महाविद्यालय, सायन्स कॉलेज, अनिल थोरात — शिक्षकेतर कर्मचारी, सायन्स कॉलेज, सौ. प्रफुल्लता फुलारी — उत्कृष्ट शिक्षक, पीपल्स हायस्कूल, विश्वास अंबेकर — शिक्षकेतर कर्मचारी, पीपल्स हायस्कूल, कचरु रासे — कार्यालय, नांदेड एज्युकेशन सोसायटी, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विजय कदम व श्रद्धा सावले यांनी केले.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments