Friday, June 26

Tag: Talents won the hearts of the audience

Palaspan : पळसपान स्नेहसंमेलनात बहारदार सादरीकरण — कलागुणांनी प्रेक्षकांची जिंकली मने

Palaspan : पळसपान स्नेहसंमेलनात बहारदार सादरीकरण — कलागुणांनी प्रेक्षकांची जिंकली मने

नांदेड, मनोरंजन
नांदेड| शनिवारची गार कातरवेळ आणि उत्साहाने भारलेले वातावरण… स्वामी रामानंद तीर्थ यांच्यासह अनेक स्वातंत्र्यसैनिक व समाजसेवकांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नांदेडच्या भूमीत नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवी ‘पळसपान’ वार्षिक स्नेहसंमेलनाचा सोसायटीच्या खुल्या मंचावर उत्साहात समारोप झाला. प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बहारदार सादरीकरणाने उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. चौथ्या पळसपान स्नेहसंमेलनाचे उद्घाटन सोसायटीच्या सदस्या सौ. अनुजा डोईफोडे यांच्या हस्ते झाले. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध उद्योगपती अलीभाई पंजवानी होते. या वेळी सोसायटीचे अध्यक्ष डॉ. व्यंकटेश काब्दे, उपाध्यक्ष सीए डॉ. प्रवीण पाटील, सचिव सौ. श्यामल पतकी, सहसचिव अॅड. प्रफुल्ल अग्रवाल, सदस्य अॅड. प्रदीप नागापूरकर, नौनिहालसिंग जहागीरदार, दीपनाथ पत्की आदी मान्यवर उपस्थित होते. या स्नेहसंमेलनाची ...
error: Content is protected !!