श्रीक्षेत्र माहूर l माहूर तालुक्यातील मौजे अनमाळ येथील अत्यंत हालाखीच्या परिस्थितीतून जिद्द व चिकाटीने शिक्षण घेत अन्नसुरक्षा अधिकारी म्हणून झेप घेत आयुष्याचे सार्थक करून अतिशय उंच डोंगरावर वसलेल्या कुठलीही सुविधा नसलेल्या मौजे अनमाळ चे नाव मोठे करणाऱ्या अंकुश नरवाडे याचा प्रशांत भाऊ राठोड यांनी सेवा संकल्प प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांसह त्याचे घरी जाऊन हृदय सत्कार केला यावेळी मान्यवर उपस्थित होते


अनमाळ, तालुका माहूर येथील अंकुश दिलीपराव नरवाडे याची “अन्न सुरक्षा अधिकारी” या पदावर निवड झाली .एका गरीब कुटुंबातील आणि मागास, दुर्गम भागातील विद्यार्थ्याची वरिष्ठ पदावर झालेली निवड ही समाजासाठी आणि तालुक्यासाठी अभिमानाची बाब आहे. त्यामुळे प्रशांत भाऊ राठोड यांनी अनमाळ येथे जाऊन चिरंजीव अंकुश याचे हार्दिक अभिनंदन केले. तसेच कुटुंबियांचाही गौरव केला.डॅा. बाबासाहेबांनी समाजाच्या विकासासाठी आणि उन्नतीसाठी शिक्षण किती महत्त्वाचे आहे, याबद्दल सांगितले आहे; याचेही प्रशांत भाऊंनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून दाखले दिले. तसेच अपार कष्टाच्या आणि बिनतोड मेहनतीच्या जोरावर यशाचे शिखर सर करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही,असे सांगत उपस्थित विद्यार्थ्यांनीही अंकुश चा आदर्श घ्यावा आणि पालकांनीही विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार शिक्षणाकडे लक्ष द्यावे असे आवाहन यावेळी केले

यावेळी बंडू राठोड दिनेश पवार दीपक कांबळे प्रदीप पवार दिलिप नरवाडे कीसन भवरे सागर नरवाडे गौतम खडसे शिल्पकार वाठोरे राजू राठोड दीपक चव्हाण विजय कांबळे निरंजन भाऊ अविनाश राठोडयांचे सह प्रशांत भाऊ राठोड सेवा संकल्प प्रतिष्ठानचे कार्यकर्ते सोबत होते.
