माहूर l तालुक्यासह माहूर शहरात आदिवासी , बंजारा अठरा पगड जातीबहुल व धार्मिकदृष्ट्या प्रसिद्ध असलेल्या माहूर शहरात आज पुन्हा एकदा सामूहिक ऐक्य, श्रद्धा आणि सामाजिक जाणिवेचे दर्शन घडवत खीरदान व तथागत भगवान गौतम बुद्ध जयंतीचा उत्सव स्वर्गीय पिपळीबाई पूरसिंग राठोड यांच्या स्मृती प्रित्यर्थ अतिशय उत्साहात, भक्तिभावाने तहसील गेटवरील श्री दत्तकृपा टी स्टॉल येथे सामाजिक बांधिलकीने खीरदान कार्यक्रम साजरा केला. सकाळी १० वाजता सुरू झालेल्या या कार्यक्रमात गावातील नागरिकांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली यावेळी दानशूर तथा सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले प्रशांत भाऊ राठोड यांची प्रामुख्याने उपस्थिती होती


या कार्यक्रमाचे आयोजन आणि प्रयोजक श्री दत्तगुरु टी स्टॉलचे संचालक विजय कांबळे काँग्रेसचे निरंजन केशवे माजी सभापती दीपक कांबळे देविदास वानखेडे शिवसेना शिंदे गटाचे विनोद सूर्यवंशी तालुकाध्यक्ष बालाजी गेंटलवार भाजपचे तालकाध्यक्ष निळकंठ मस्के शिवसेना तालुकाप्रमुख माजी सभापती उमेश जाधव तांदळाचे सरपंच संतोष जाधव नवल वानखेडे सिद्धार्थ भालेराव दयाळू जाधव बंडू चव्हाण यांचे सह मान्यवरांनी आयोजन केले होते कार्यक्रमाची सुरुवात भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. सामूहिक वंदनेने वातावरण भारावून गेले होते. या प्रसंगी सर्व उपस्थितांनी शांतता, सहिष्णुता आणि करुणा यांचे प्रतीक असलेल्या खीरदान उपक्रमात सहभागी होत श्रद्धेचे दर्शन घडवले. खीरदान हा बुद्ध जयंतीच्या निमित्ताने करण्यात आलेला एक महत्त्वपूर्ण सामाजिक उपक्रम असून, या माध्यमातून बौद्ध धम्मातील दातृत्व व समता या मूल्यांचे पुनरुच्चारण झाले.

यावेळी प्रशांत भाऊ राठोड यांचे सह त्यांच्या मित्र मंडळाचे कार्यकर्ते ज्येष्ठ पत्रकार नंदू संतान प्रतापसिंह हजारे सपोनी शिवप्रकाश मुळे यांचे सर्व पोलीस बांधवासह तहसील कार्यालयातील नयनसिंह राठोड उदय वानखेडे पाईकराव पवन बेहरे विक्रम जगताप धर्मा गवळे दीपक ठाकूर सलीम भाई कदिर भाई बावाणी अंकुश ठाकूर जावेद पेंटर सिद्धार्थ भालेराव पत्रकार जयकुमार अडकिने पत्रकार इलियास बावाणी यांचे सह मान्यवर उपस्थित होते तालुक्यात ठिकठिकाणी खीरदान कार्यक्रम उत्साहात पार पडला
