Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - Blog - शालेय विद्यार्थ्यांना लवकरच दर्जेदार एकसमान गणवेश देणार; शालेय शिक्षण विभागाचे स्पष्टीकरण – NNL
Blog June 14, 2024

शालेय विद्यार्थ्यांना लवकरच दर्जेदार एकसमान गणवेश देणार; शालेय शिक्षण विभागाचे स्पष्टीकरण – NNL

NNL TeamBy NNL TeamJune 14, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

मुंबई| ‘एक राज्य एक गणवेश’ योजनेची अंमलबजावणी सन 2024-2025 या शैक्षणिक वर्षापासून करण्यात येत आहे. त्याअंतर्गत शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इयत्ता पहिली ते आठवीतील सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन मोफत गणवेश पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला असून यापैकी एक गणवेश नियमित स्वरूपाचा तर दुसरा गणवेश स्काऊट व गाईड या विषयाकरिता निर्धारित करण्यात आलेला आहे. याकरिता प्रती गणवेश 300 रुपये आर्थिक तरतूद उपलब्ध असून त्यातील 190 रुपये कापड खरेदीकरिता तर 110 रुपये शिलाई, अनुषंगिक खरेदी व वाहतुकीकरिता निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार महिला आर्थिक विकास महामंडळाकडून गणवेशाच्या शिलाईचे काम जोमाने सुरू असून विद्यार्थ्यांना लवकरात लवकर गणवेश उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती शालेय शिक्षण विभागामार्फत देण्यात आली आहे. या निर्णयाचा लाभ राज्यातील 44 लाख 60 हजार 004 विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

समग्र शिक्षा अभियान या कार्यक्रमांतर्गत मागील काही वर्षांपासून राज्यातील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये गणवेशाचे कापड व शिलाई करून विद्यार्थ्यांना गणवेश उपलब्ध करून देण्यात येत होते. या प्रक्रियेमध्ये गणवेशाच्या रंगसंगतीमध्ये एकसमानता नसून शालेय समिती व मुख्याध्यापकांना कापडाच्या दर्जाबाबत परिपूर्ण माहिती नसल्याने बऱ्याच वेळा कमी दर्जाचे कापड प्राप्त होणे आदी त्रुटी जाणवून आल्या आहेत. या बाबींचा विचार करून एक राज्य एक गणवेश योजना राबविण्यात येत आहे. याबाबतचा शासन निर्णय 8 जून 2023 रोजी निर्गमित करण्यात आला असून 10 जून 2024 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे स्काऊट व गाईड गणवेशाबाबत अधिक स्पष्टता करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे हा शासन निर्णय निर्गमित करण्यास काही कालावधी लागला असला तरी याबाबतचे नियोजन यापूर्वीच करण्यात आले असल्याचेही विभागामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.

शासन स्तरावरून ‘एक राज्य एक गणवेश’ या धोरणाची अंमलबजावणी करताना केंद्र शासनाच्या वस्त्रोद्योग मंत्रालयांतर्गत येणाऱ्या टेक्सटाईल कमिटी या प्रतिष्ठित संस्थेची मदत घेण्यात आली असून या संस्थेशी सखोल चर्चा करून उच्च दर्जाच्या गणवेशासाठी कापडाचे तांत्रिक निकष निश्चित करण्यात आले आहेत. गणवेश शिलाईचे काम स्थानिक महिला बचत गटामार्फत करण्यात येत असल्याने या महिलांना रोजगार उपलब्ध होत असून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यास मदत होत आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाद्वारे या कामाचे संपूर्ण नियोजन करण्यात येत आहे. महामंडळाद्वारे राज्यातील प्रत्येक तालुक्यात शिलाई केंद्र स्थापन करण्यात आले असून त्याद्वारे शिलाईचा दर्जा उत्तम राखण्याच्या दृष्टीने बचत गटाच्या महिलांना प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांना गणवेश तातडीने उपलब्ध व्हावेत, या उद्देशाने स्काऊट व गाईड या गणवेशाचे कापड शाळा व्यवस्थापन समितीस सुपूर्द करण्यात येत असून शालेय व्यवस्थापन समित्यांनाही शिलाई व अनुषंगिक वाहतूक खर्चासाठी प्रती गणवेश 110 रुपये अदा करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे इयत्ता सहावी ते आठवीमधील सर्व मुलींना सलवार, कमीज व दुपट्टा या स्वरूपात गणवेश पुरवठा करण्यात येत आहे. तर उर्दू माध्यमाच्या शाळांमधील मुलींना इयत्ता पहिली पासूनच सलवार, कमीज व दुपट्टा देण्यात येत असल्याची बाब विचारात घेऊन उर्दू माध्यमाच्या शाळांमधील मुलींनाही सलवार, कमीज व दुपट्टा या स्वरूपात गणवेशाचा पुरवठा करण्यात येत आहे.

गणवेशाच्या कापडाचा दर्जा उत्तम राहण्याच्या दृष्टीने सर्व खबरदारी घेण्यात येत असून विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचा गणवेश उपलब्ध होणार आहे. या गणवेशाबरोबरच स्काऊट व गाईड विषयाशी सुसंगत स्कार्फ, स्काऊट बेरेट कॅप व वॉगल, तसेच भारत स्काऊट गाईड राष्ट्रीय कार्यालय, नवी दिल्ली यांचे साहित्य देखील शाळा स्तरापर्यंतच्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याचबरोबर राज्य शासनाद्वारे विद्यार्थी व विद्यार्थीनींना एक जोडी बूट व दोन जोडी पायमोजेही पुरविण्यात येणार असून याबाबतचा निधी देखील शाळा व्यवस्थापन समितीला प्रदान करण्यात आला आहे. शालेय गणवेशाचा पुरवठा विद्यार्थ्यांना लवकरात लवकर व्हावा, या उद्देशाने शासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत असल्याचे शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

School students will soon be given quality uniforms; Explanation of School Education Department
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous Articleवृक्ष लागवड, लेक लाडकी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचे निर्देश – NNL
Next Article पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना आवश्यक सुविधा द्याव्यात -उपमुख्यमंत्री अजित पवार – NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

नदीपात्रावरील चोले पेंड येथे तीन तराफे जाळले पैनगंगा नदीपात्रावरील कु प्रसिद्ध चोले पेंड येथून वाळू तस्करी सुरूच

आई वडिलांचे छत्र हरवलेल्या माधवची एमबीबीएसला निवड आजी व चुलता चुलतीच्या परिश्रमाचे यश

Rajmata Jijau Jayanti ; राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त खिचडी वाटप बाळा देशमुख व सतीश शिंदे यांचा पुढाकार

वाळू चोरी करून नेणारे दोन ट्रॅक्टर पकडले

soybeans burned : शहापूर परिसरात दहा एकरातील सोयाबीन जळालं; शेतकरी उघड्यावर

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Talathi B. T. Shelke – निराधार महिलांचा छळ करणाऱ्या तलाठी बी.टी.शेळकेची हकालपट्टी करा व पीडित दलितांना घरकुल मंजूर करा! – NNL

August 21, 2024

Police route march : हिमायतनगर शहरात पोलिसांनी रूटमार्च काढून केलं कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचं आवाहन -NNL

October 25, 2024

Beneficiary farmers of Chandrapur district ; चंद्रपूर जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांना ३१ ऑगस्ट पर्यंत मिळणार संपूर्ण पिक विमा रक्कम – NNL

August 8, 2024

The kind-hearted king of the world of friendship: Vijay Joshi : मैत्रीच्या दुनियेचा दिलदार राजा: विजय जोशी

March 22, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Supplementary Examination Time Table | इयत्ता दहावी व बारावी पुरवणी परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये बदल -NNL

Sanjay Warkad ; भगवान बिरसा मुंडे यांचा तरुणांनी आदर्श घ्यावा तहसीलदार संजय वारकड

Himaytnagar news : हिमायतनगर येथील उपजिल्हा रुग्णालयासमोरचा आठवडी बाजार ठरतोय जीवघेणा अडथळा!

Veerashaiva Lingayat majority constituency ; वीरशैव लिंगायत समाजाच्या उमेदवारांना उमेदवारी न मिळाल्यास वीरशैव लिंगायत बहूल मतदार संघात आम्हाला ‘नोटा’ चा पर्याय उपलब्ध ! – NNL

Nanded District Rainfall Report | नांदेड जिल्हा पावसाचा अहवाल दि. 16 जुलै 2024 – NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?