श्रीक्षेत्रमाहूर, राज ठाकूर| केंद्र शासन व राज्य शासन सार्वजनिक आरोग्य विभाग यांनी नवरात्र महोत्सवाच्या दृष्टीने स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान अंतर्गत ग्रामीण रुग्णालय माहूर येथे दि २६ रोजी माता व बालकांची आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले असुन आयोजित शिबिरात सहभाग नोंदवून आरोग्य तपासणी करून घ्यावे असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ. किरण कुमार वाघमारे यांनी केले आहे.


उपसंचालक डॉ. रेखा गायकवाड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, निवासी वैद्यकीय अधिकारी बाह्य डॉ. राजाभाऊ बुट्टे यांच्या मार्गदर्शनात शिबिर होणार असून या आरोग्य शिबिरास प्रमुख उपस्थिती हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर, आ. भीमरावजी केराम, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी जेनीत चंद्रा दोन्थुला, तहसीलदार अभिजीत जगताप आदी मान्यवरांच्या उपस्थिती राहणार आहे अशी माहिती ग्रामीण रुग्णालय चे वैद्यकीय अधीक्षक डॉ. किरणकुमार वाघमारे यांनी दिली.


या आरोग्य शिबिरात महिलांची रक्तदाब ,मधुमेह, दंतरोग ,नेत्ररोग स्तन व गर्भाशय मुख ,कर्करोग तपासणी, तर महिलांसाठी व बालकांसाठी लसीकरण सेवा, क्षयरोग तपासणी ,सिकलसेल, आजार, पोषण आहार मार्गदर्शन प्रदर्शन, मानसिक आरोग्य मार्गदर्शन, आयुष्यमान कार्ड व आभा कार्ड , बालकांची विशेष तज्ञ डॉक्टरा मार्फत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे अशी माहिती या शिबिराच्या नोडल अधिकारी डॉ. सुषमा चौधरी यांनी दिली. तरी तालुक्यातील महिला व बालकांनी या आयोजित शिबिरात सहभाग नोंदवून आरोग्य तपासणी करून करावी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आव्हान वैद्यकीय अधीक्षक डॉ. किरण कुमार वाघमारे यांनी केले आहे.




