Submit Aadhar card passbook : “संगांनि” श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांनी आधारकार्ड पासबुक सादर करावे – तहसीलदार परळीकर -NNL

लोहा| तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ, इंदिरा गांधी वृद्धोपकाळ या योजनेच्या लाभार्थ्यांनी आपले आधार कार्ड बँक पासबुक खात्याची झेरॉक्स आणि सुरू असलेला मोबाईल क्रमांक लोहा तहसील कार्यालयाच्या संजय गांधी निराधार विभागात आणू द्यावेत. असे आवाहन तहसीलदार विठ्ठल परळीकर यांनी केले आहे.


संजय गांधी निराधार, श्रावण बाळ, इंदिरा गांधी वृद्धोपकाळ या योजनेचे लाभार्थ्यांना सप्टेंबरपासून महाडीबीटीद्वारे अनुदान वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी शासनाने तास निर्देश दिले आहेत. आधार कार्ड, बँक पासबुक व सुरू असलेला मोबाईल क्रमांक जो की संलग्न ही कागदपत्रे तहसील कार्यालयात आणून द्यावीत ज्यांनी दिली नाहीत असा लाभार्थ्यांना अनुदान वाटप करताना अडचण येणार आहे.

सर्व लाभार्थ्यांनी तहसील कार्यालय १३ सप्टेंबरपर्यंत या विभागाच्या प्रमुख श्रीमती चाटे यांच्याकडे अर्ज सादर करावेत. सर्व लाभार्थ्यांचे अनुदान सप्टेंबर पासून महा डीबीटीद्वारे शासन स्तरावरुन पडणार आहेत सदर माहिती जे देणार नाहीत त्या लाभार्थ्यांचे १५ सप्टेंबरपासून अनुदान बंद करण्याबाबत शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत. याची सर्व लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी व आपले कागदपत्र सादर करावेत, असे आवाहन तहसीलदार विठ्ठल परळीकर यांनी केले आहे.





