Submit Aadhar card passbook : “संगांनि” श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांनी आधारकार्ड पासबुक सादर करावे – तहसीलदार परळीकर -NNL
लोहा| तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ, इंदिरा गांधी वृद्धोपकाळ या योजनेच्या लाभार्थ्यांनी आपले आधार कार्ड बँक पासबुक खात्याची झेरॉक्स आणि सुरू असलेला मोबाईल क्रमांक लोहा तहसील कार्यालयाच्या संजय गांधी निराधार विभागात आणू द्यावेत. असे आवाहन तहसीलदार विठ्ठल परळीकर यांनी केले आहे.
संजय गांधी निराधार, श्रावण बाळ, इंदिरा गांधी वृद्धोपकाळ या योजनेचे लाभार्थ्यांना सप्टेंबरपासून महाडीबीटीद्वारे अनुदान वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी शासनाने तास निर्देश दिले आहेत. आधार कार्ड, बँक पासबुक व सुरू असलेला मोबाईल क्रमांक जो की संलग्न ही कागदपत्रे तहसील कार्यालयात आणून द्यावीत ज्यांनी दिली नाहीत असा लाभार्थ्यांना अनुदान वाटप करताना अडचण येणार आहे.
सर्व लाभार्थ्यांनी तहसील कार्यालय १३ सप्टेंबरपर्यंत या विभागाच्या प्रमुख श्रीमती चाटे यांच्याकडे अर्ज सादर करावेत. सर्व लाभार्थ्यांचे अन...
