नांदेड| ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२०’ अंमलबजावणीच्या अनुषंगाने शालेय विद्यार्थ्यांना या शैक्षणिक धोरणाची माहिती करून देण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व अकृषी विद्यापीठ स्तरावर ‘स्कूल कनेक्ट २.०’ हे संपर्क अभियान राबविण्यात येत आहे. याबाबत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ विविध कार्यक्रमाचे आयोजन करून राज्यात अग्रेसर आहे.
![](https://nnlmarathi.com/wp-content/uploads/2024/12/Vardhaman-2.png)
विज्ञान व तंत्रज्ञान राष्ट्रीय परिषद, राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम दि. ३० डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता. या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉ. सूर्यकांत जोगदंड, विद्यापीठाचे कुलसचिव तथा गणितीयशास्त्र संकुलाचे संचालक डॉ. डी. डी. पवार आणि शिक्षण अधिकारी माधव सलगिरे यांची उपस्थिती होती.
![](https://nnlmarathi.com/wp-content/uploads/2024/06/Chidrawar-10x20-News.jpg)
या प्रशिक्षणामध्ये शालेय शिक्षकांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत अवगत करून दिले. यामध्ये आधुनिक अध्यापन पद्धती, प्रश्न आधारित शिक्षण, नाविन्यपूर्ण शिक्षण पद्धतीवरून शिक्षण कौशल्यामध्ये वाढ, समाज उपयोगी संशोधन पर आधारित शिक्षण पद्धती इत्यादी बाबतीत शिक्षण तज्ञांनी मार्गदर्शन केले. यामध्ये पुणे येथील डॉ. विनायक जोशी, डॉ. वाय.एम. बोरसे, नागपूर येथील डॉ. गणेश केदार, छत्रपती संभाजीनगर येथील साजिद शेख, संकुलाचे संचालक डॉ. डी.डी. पवार आणि डॉ. बी. सुरेंद्रनाथ रेड्डी या सर्व तज्ज्ञांनी शालेय शिक्षकांना मार्गदर्शन करून संवाद साधला. यामध्ये ३८० शालेय शिक्षकांनी सहभाग घेतला होता.
![](https://nnlmarathi.com/wp-content/uploads/2024/07/saai-1.jpg)
या प्रशिक्षणामध्ये शिक्षकांना अधिक सक्षम बनवण्यासाठी तज्ज्ञ प्रशिक्षक बोलतांना म्हणाले, शिक्षक हे शिक्षण क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत. त्यांच्यावर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा आणि भविष्यातील यशाची जबाबदारी असते. शिक्षकांना अधिक सक्षम बनविण्यासाठी काही महत्त्वाचे मार्गदर्शन दिले जाऊ शकते. त्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणि शिक्षण पद्धतीचा अवलंब करून शिक्षकांना विद्यार्थ्यांना अधिक प्रभावीपणे शिकवता येईल. ‘इनोव्हेटिव्ह पेडागॉजी’ आणि ‘इनव्कीरी बेस्ड लर्निग’ यासारख्या पद्धतींना शिक्षणात समाविष्ट करून शिक्षक विद्यार्थ्यांसाठी एक संवादात्मक आणि प्रेरणादायक वातावरण तयार करू शकतो. याशिवाय नियमितपणे प्रशिक्षण कार्यक्रम, कार्यशाळा आणि वेबिनार्स आयोजित करून शिक्षकांची शैक्षणिक कौशल्य सुधारता येतात प्रत्येक विद्यार्थ्यांची वेगळी शिकण्याची गती ओळखून त्यांना योग्य मार्गदर्शन देणे आवश्यक आहे.
![](https://nnlmarathi.com/wp-content/uploads/2025/01/IMG-20250103-WA0006.jpg)
शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या गरजा समजून त्यानुसार शिक्षण पद्धतीचा अवलंब करणे महत्त्वाचे आहे. तसेच शिक्षकांनी त्यांच्या कार्यात सर्जनशीलता आणि समर्पण दाखवून विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडी आणि अभिरुचीनुसार शिकवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मुलायम कौशल्याचा विकास देखील महत्त्वपूर्ण आहे, जसे की संवाद कौशल्य, टीमवर्क आणि समस्या सोडवण्याची क्षमता या सर्व गोष्टी शिक्षकांच्या सक्षमीकरणासाठी आवश्यक आहेत. नवीन शैक्षणिक धोरण-२०२० अंतर्गत प्रकल्प आधारित शिक्षण, नाविन्यपूर्ण पद्धती आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर अधिक लक्ष दिले जात आहे. शिक्षकांनी या धोरणाचा प्रभावी वापर करून विद्यार्थ्यांना सर्वोत्तम विकासासाठी मार्गदर्शन करणे आवश्यक आहे.
यामुळे शिक्षक अधिक सक्षम होऊन विद्यार्थ्यांना योग्य दिशा देऊन त्यांचे भविष्य उज्वल करू शकतात. आणि आपल्या अध्यापन पद्धतीमध्ये सुधारणा करण्याची नवीन तंत्रज्ञान आणि शिक्षण पद्धतीचा स्वीकार करण्याची प्रेरणा दिली. यामध्ये शिक्षकांनी अनुभवलेल्या कार्यशाळा आणि संवाद सत्रामुळे त्यांच्या शैक्षणिक दृष्टिकोनात अधिक व्यापक झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयक्यूएससी विभागाचे संचालक डॉ. बी. सुरेंद्रनाथ रेड्डी यांनी केले तर आभार प्रा. डॉ. रूपाली जैन यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गणितीयशास्त्र संकुलातील डॉ. अनिकेत मुळे, डॉ. नितीन दारकुंडे, डॉ. उषा सांगळे, डॉ. दिव्यावीर यांनी विशेष परिश्रम घेतले.