नांदेडमहाराष्ट्र

Train Delayed : पूर्णा–आदिलाबाद पॅसेंजर पुन्हा ५ तास उशिरा; प्रवाशांचा संताप, तातडीने कारवाईची मागणी

हिमायतनगर, अनिल मादसवार| दि. 12 फेब्रुवारी 2026 रोजी पूर्णा–आदिलाबाद पॅसेंजर ही गाडी सायंकाळी ७ वाजता नांदेडहून सुटणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात ही गाडी तब्बल पाच तास उशिरा, रात्री ११ वाजता निघाली. परिणामी गाडी हिमायतनगर रेल्वे स्थानक येथे रात्री २ वाजता पोहोचली.

या विलंबामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. महिला, ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थी यांना मध्यरात्रीपर्यंत थांबावे लागल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. कधी तासभर, कधी दोन तास तर कधी पाच तास ही गाडी उशिरा धावत असल्याने प्रवाशांच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होत आहे.

हा प्रकार लक्षात आल्यानंतर हिमायतनगर येथील वार्ड क्रमांक १७ चे नगरसेवक सुभाष पोतन्ना बलपेलवाड यांनी रेल्वे प्रशासनाकडे लेखी तक्रार दाखल केली. यावेळी अब्दुल सलाम, मिर्झा नुही बेग, आत्मराम माने, ऋतिक अक्कलवाड यांच्यासह अनेक प्रवासी उपस्थित होते.

IMG 20260213 WA0136 Train Delayed : पूर्णा–आदिलाबाद पॅसेंजर पुन्हा ५ तास उशिरा; प्रवाशांचा संताप, तातडीने कारवाईची मागणी

प्रवाशांनी रेल्वे विभागाच्या “लेट लतीफ” कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त करत, गाड्या वेळेवर सोडाव्यात व पुन्हा अशी गैरसोय होऊ नये यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.

वारंवार होणाऱ्या विलंबामुळे नागरिक त्रस्त झाले असून, रेल्वे प्रशासनाने तातडीने लक्ष घालून जनतेचा विश्वास परत मिळवावा, अशी जनहितार्थ मागणी होत आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!