Jyoti Sanket Patil ; नांदेड जिल्हा गावकामगार महिला पोलीस पाटील संघटनेच्या जिल्हा सचिवपदी ज्योती संकेत पाटील यांच्यी नियुक्ती – NNL

नवीन नांदेड l महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील नांदेड जिल्हा महिला संघटना सचिवपदी सोमुर ता. देगलूर येथील ज्योती संकेत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असून राज्यध्याक्ष पंढरीशेठ पाटील यांच्या व नांदेड जिल्ह्यातील व नांदेड तालुक्यातील नवनियुक्त पोलीस पाटील व नांदेड जिल्हा महिला आघाडीच्या पदाधिकारी नियुक्ती व सत्कार नवीन कौठा येथील सप्तगिरी बॅकेट हाॅल येथे आयोजन १९ सप्टेंबर रोजी करण्यात आले नांदेड येथे १९ सप्टेंबर रोजी राज्यध्याक्ष पंढरीनाथ शेठ पाटील यांच्या सत्कार सोहळा आयोजित करण्यात आले होते.

यावेळी राज्यपाल पुरस्कार प्राप्त राज्य उपाध्यक्ष खंडेराव बकाल, कोकण विभागाचे अध्यक्ष संजय पाटील, राज्य सहसचिव लक्ष्मण पाटील,
पनवेल संघटना सचिव भरत पाटील,रायगड संघटना प्रमोद आगलावे,नांदेड जिल्हाध्यक्ष हेमंत पाटील ,जेष्ठ पोलीस पाटील शिवाजी निळेकर,मराठवाडा विभाग अध्यक्ष मारोतराव कदम,नांदेड जिल्हा उपाध्यक्ष, मारोती पांचाळ जोमेगावकर ,नांदेड जिल्हा महिला पोलीस पाटील सौ.सुमनबाई खोसडे यांच्या सह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी नांदेड महिला आघाडी सचिव सौ.ज्योती संकेत पाटील,नांदेड तालुका अध्यक्ष जयश्री ताई संजय इंगळे पाटील, व नांदेड तालुक्यातील नवनियुक्त पोलीस पाटील यांच्या सत्कार वसरणी लवकुश अवनुरे, गुंडेगाव पांडुरंग हंबर्डे,किक्कि गोविंद तेलंगे, बळीरामपुर भास्कर बुध्देवार, काकांडी बाळु वाघमारे, डोनवाड मंगेश, बाभुळगाव संतोष मोरे,निमजी पिंपळगाव, खुपसरवाडी सुनिल मंदावाड,कंधार कदम, निळा बाळासाहेब जोगदंड, दहेली तांडा, बाळु पवार, विष्णपूरी प्रविण हंबर्डे, बोढार देवराव कोकारे ,जाकापुरकर , यांच्या सत्कार करण्यात आला. या सोहळ्याला नांदेड जिल्ह्यातील पोलीस बांधव उपस्थिती होती. सौ. ज्योती पाटील यांच्यी नियुक्ती बदल अभिनंदन करण्यात आले.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button