नांदेड| पलाशा संजय नलावडे हिने इयत्ता ७ वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्याथीनीने अबॅकस परीक्षेमध्ये तीसरा क्रमांक मीळवला आहे. या यशाबद्दल सर्व शीक्षक आणि पालकांनी तिचे अभिनंदन केले आहे.
श्रीपतराव भोसले हायस्कूल, धाराशिव या ठिकाणी पलाशा संजय नलावडे हि शिक्षण घेत असून, आत्तापर्यंत तिने शिक्षण क्षेत्रात घवघवीत यश मिळविले आहे. श्रीमती कावेरी देशमुख, तेजन नागेशराव देशमुख यांनी पुष्पगुच्छ देऊन तीचे अभिनंदन केले. तर साई संजयराव जमदाडे, प्रणव जमदाडे यांनी चॉकलेट गिफ्ट दिले, तसेच कु.पलाशा नलावडे हिस वर्षा जमदाडे यांनी अनेक शुभ आशीर्वाद देऊन पुढील वाटचालीस शुभेछा दिल्या आहेत. सौ ज्योती, डॉक्टर संजय नलावडे, कु. चिराग नलावडे यांनी देखील अभिनंदन केले आहे.