नांदेडसोशल वर्क

Flag hoisting : सवना ग्रामपंचायतीत प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण थाटात संपन्न

हिमायतनगर, अनिल मादसवार| प्रजासत्ताक दिनाच्या ७७ व्या वर्धापनदिनानिमित्त सवना येथील ग्रामपंचायत कार्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि राष्ट्रभक्तीच्या वातावरणात पार पडला.

ग्रामपंचायतीच्या प्रांगणात सरपंच परमेश्वर गोपतवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रगीताच्या सुरांनी परिसर दुमदुमून गेला. कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, गावातील ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक तसेच शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी राष्ट्राच्या एकता, अखंडता आणि लोकशाही मूल्यांचे महत्व अधोरेखित करत ग्रामविकासासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन केले. स्वच्छता, शिक्षण, आरोग्य व लोकसहभागाच्या माध्यमातून गावाचा सर्वांगीण विकास साधण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांना मिठाई वाटप करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध व उत्साही वातावरणात पार पडला.

तसेच येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक सतीश परमेश्वर गोपतवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला. राष्ट्रध्वजाला सलामी दिल्यानंतर शालेय विद्यार्थ्यांना खाऊचे वितरण करण्यात आले. सेवा सहकारी सोसायटीत चेयरमन परमेश्वर गोपतवाड यांच्या उपस्थितीत सोसायटीचे संचालक बालाजी आलेवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button