HomeनांदेडPanchayat Raj Abhiyan : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा प्राणिताताईच्या हस्ते टाकळगाव येथे...

Panchayat Raj Abhiyan : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा प्राणिताताईच्या हस्ते टाकळगाव येथे शुभारंभ

लोहा| मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज राज्यस्तरीय अभियान सुरू करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार उपमुख्यमंत्री, एकनाथ शिंदे, यांनी पंचायतराज समृद्ध होण्यासाठी याची सुरुवात केली आहे.

आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांच्या मार्गदर्शनात तालुक्यातील टाकळगाव येथे भाजपाच्या महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा प्राणिताताई देवरे -चिखलीकर याच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या शुभ मुहूर्तावर लोहा तालुक्यातील टाकळगाव येथे या अभियानाची सुरुवात झाली. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज होण्यासाठी ग्राम स्वच्छता अभियान आणि लोकसहभागातून शंभर दिवसाच्या कार्यक्रम देण्यात आला आहे. त्यासाठी 100 गुणांची विभागणी विविध उपक्रमांत करण्यात आली आहे.

ग्राम समृद्धीच्या चळवळीत सर्वांनी सहभागी होऊन आपल्या गावाचा शाश्वत विकास साधण्याकरिता लोहा कंधार या दोन्ही तालुक्यातील सर्व गावांनी सहभागी व्हावे असे आवाहन प्राणिताताई देवरे चिखलीकर यांनी केले. पुढे त्या म्हणाल्या की समृद्ध महाराष्ट्र होण्यासाठी समृद्ध गाव होणे गरजेचे आहे. त्यातही सर्व ग्रामस्थाचा आपल्या गावासाठी या अभियानात सक्रिय सहभाग असायला पाहिजे. सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी अंगणवाडीताई ,आशा वर्कर,बचत गटातील सर्व सदस्या,ग्रामस्थांनी या अभियानात अग्रणी पुढाकार घ्यावा असे त्यांनी संबोधित केले भावना व्यक्त केल्या आणि पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज राज्यस्तरिय अभियान लोहा तालुक्यातील टाकळगाव येथून शुभारंभ झाला या कार्यक्रमासाठी अधिकारी धनंजय देशपांडे,सरपंच सौ.कमलबाई लामदाडे,तंटामुक्ती आध्यक्ष शंकरराव मोरे,चेअरमन शिवाजीराव मोरे,उपसरपंच संभाजी चिंचोरे, काशिनाथ लामदाडे,भीमराव लामदाडे, मुख्याध्यापक काशिनाथ कांबळे,ग्रामविकास अधिकारी अमृत राव शिंदे,प्रेमचंद कदम, दिगंबर सावकार,गोविंदबापू लामदाडे, बळीराम मोटे,सुरेश मोटे यांच्यासह मोठया संख्यने गावकरी उपस्थित होते.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments