हिमायतनगर,अनिल मादसवार| आंदोनकर्त्यांना दिलेला लेखी आश्वासनाची पूर्तता करण्यास नगरपंचायती कडून टाळाटाळ… राजकीय नेत्यांच्या दुर्लक्षित कारभारामुळे शहरातील शेकडो लाभार्थी घरकुलाच्या लाभापासून वंचित…. श्री परमेश्वर मंदिर ट्रस्ट समोर शासनाच्या विरोधात दिनांक १६ रोजी बेमुदत थाळी नाद आंदोलन करण्याचा इशारा दिल्याचे वृत्त प्रकाशित करताच हिमायतनगर नगरपंचायतीने बुधवारी आंदोलनकर्त्यांच्या समस्ये संदर्भांव्ये बैठक घेतली. मात्र हि बैठक देखील फेल ठरली असून, नमुना नंबर 43 देण्याबाबत कार्यवाही सुरू केली असल्याचा जोपर्यंत ठोस लेखी पत्र किंवा त्याचा पुरावा दिला जात नाही तोपर्यंत पुढील आंदोलन मागे घेतले जाणार नाही. दिनांक १६ रोजी श्री परमेश्वर मंदिरासमोर होणारे आंदोलन अधिक तीव्र होईल असे कॉम्रेड दिगंबर काळे यांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलतां सांगितले आहे.


मंगळवार नांदेड न्यूज लाईव्ह वृत्त प्रकाशित करताच काल दिनांक ०९ बुधवारी नगरपंचायत प्रशासनाने नमुना नंबर 43 पासून वंचित असलेल्या नागरिकांच्या हक्कासाठी आंदोलन करणाऱ्या प्रमुखांना बोलावून बैठक घेतली आहे. सुरुवातीला बैठक नगरपंचायत मध्ये असल्याचे सांगितले गेले. नगरपंचायतीला आल्यानंतर पुन्हा अंदोलनकर्ते यांना शासकीय विश्रामग्रहात बैठक असल्याचे सांगून बोलावण्यात आले. त्यामुळे केवळ परेशान करण्यासाठी बैठक ठेवल्याचे लक्षात आल्याने गोर गरिबांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन करणारे प्रमुख बैठकीला जाण्यास अनुत्सुक होते. मात्र वारंवार बोलावण्यात येत असल्याने अखेर लोकविकास संघर्ष समितीचे प्रमुख आंदोलनकर्ते बैठकीस उपस्थित झाले. बुधवारी दुपारी घेण्यात आलेल्या बैठकीला तालुक्याचे आमदार, नगरपंचायतीचे प्रभारी मुख्याधिकारी, भूमि अभिलेख, महसूल व अन्य अधिकारी कर्मचारी तसेच नगरपंचायतीच्या कामकाज आमच्यामुळे चालते असे दाखविण्यासाठी नेहमी लुडबुडू करणारे काही राजकीय कार्यकर्ते देखील या बैठकीस उपस्थित होऊन पुढे पुढे करत होते. सुरु झालेली बैठक बरेच तास चालली.


नमुना नंबर 43 गावठाण मध्ये असलेल्या नागरिक 70 वर्षांपासून गावठानच्या जागेवर वास्तव्य करून तत्कालीन ग्रामपंचायत आणि आत्ताच्या नगरपंचायतीला कर भरतात. मात्र आत्तापर्यंत कोणत्याही लोकप्रतिनिधीनी येथील गोर गरिबांचा प्रश्न सोडविण्यासाठी अथवा मालकी हक्काचे प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी कुठलंच प्रयत्न केला नाही. मात्र हजारो वंचित महिला – पुरुष नागरिक आंदोलन केल्यानंतर तेही पुन्हा आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर नगरपंचायतीला जाग आली. याबाबत बुधवारी बैठक घेऊन आंदोलनकर्त्यांचे प्रमुख सी.आय. टी. यू., लाल बावटा व लोकविकस संघर्ष समितीचे अध्यक्ष कॉम्रेड दिगंबर काळे, गणेश रचेवाड, नवीनकुमार मादसवार, माजी नगरसेवक प्रभाकर अण्णा मुधोळकर यांना सांगण्यात आले कि, नव्याने सर्वे करून रसदार अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे. यावेळी आंदोलन करते दिगंबर काळे गणेश चरलेवार, नवीन मादसवार यांनी जोपर्यंत आम्हाला प्रस्ताव पाठविल्याचा लेखी पुरावा मिळत नाही तोपर्यंत आगामी काळात होणारे आंदोलन आम्ही वापस घेणार नाही असा इशारा दिला आहे. त्यामुळे नगरपंचातीने घेतलेली बुधवारची बैठक हि फेल ठरली असून, दिनांक १६ रोजी श्री परमेश्वर मंदिरासमोर होणारे आंदोलन अधिक तीव्र होईल असे दिसते आहे.

गेल्या पाच वर्षापासून नमुना नंबर 43 मिळून देतो म्हणून विद्यमान लोकप्रतिनिधींनी गोर गरीब जनतेची दिशाभूल केली. निवडून आल्यावर पाच वर्ष झाले मात्र दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही त्यामुळे आम्हाला आता कोणत्या नेत्यावर भरोसा राहिला नाही. जोपर्यंत आमच्या नमुना नंबर 43 मालकी हक्क प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचं समाधान होणार नाही. त्यामुळे आमचे आंदोलन असेच होत राहतील यापुढे आम्हाला विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार देखील टाकावा लागेल. गेल्या महिन्यात आम्ही नगरपंचायतीसमोर उन्हा-तान्हात सतत सात दिवस आंदोलन केले. त्यापूर्वीही अनेकदा निवेदन दिले मात्र नगरपंचायत प्रशासन सांगते कि, तुम्हाला 43 नंबर प्रमाणपत्र देता येत नाही असे सांगून चाल ढकल करत आहेत. सात दिवसाच्या आंदोलन चालू असताना गावात येऊन गेलेल्या राजकीय नेत्यांना आमची समस्या दिसली नाही. आंदोलन सुरु असताना तब्बल तीन वेळा काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष रेखाताई चव्हाण यांनी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा देत हा मुद्दा थेट जिल्हाधिकारी अभिजित ताट यांच्यापर्यंत पोहोचविला होता. तसेच कॉम्रेड उज्वला पडेलवार यांनी या आंदोलनात दाखल होऊन सत्ताधारी लोकप्रतिनिधींच्या काळात नागरिकांना मालकी हक्काच्या प्रमाणपत्रासाठी सात सात दिवस आंदोलन करावे लागते अशी शोकांतिका व्यक्त केली.

त्यावेळी नगरपंचायतीने काही मजुरांना जॉब कार्डचे वितरण करून अन्य मागण्या लवकरच सोडविण्यात येतील असे लेखी आश्वासन दिले होते. यासही दहा दिवसाचा कालावधी लोटला तरी बैठक तर सोडाच आंदोलन कर्त्याचे समाधान करण्याचेही सोयर सुतक नगरपंचायतीने दाखविले नव्हते. दरम्यान आंदोलनकर्त्याचे प्रतिनिधी म्हणून दररोज नगरपंचायतीला खेटे मारून देखील फायदा होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर आम्ही येणाऱ्या 16 तारखेपासून तहसीलदार अध्यक्ष असलेल्या श्री परमेश्वर मंदिरासमोर थाळी नाद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. हा इशारा दिल्यानंतर नगरपंचायतीने सत्ताधारी लोकप्रतिनिधींना संपर्क करून बैठक घेतली. मात्र या बैठकीमध्ये केवळ औपचारिकता म्हणून जिल्हाधिकारी व यांच्याशी बातचीत करून नगरपंचायतीच्या संबंधित अधिकारी कर्मचारी यांना सूचना दिल्या गेल्या असल्याचेही कॉम्रेड दिगंबर काळे यांनी म्हटले आहे.
प्रश्न निकाली निघाला नाही तर येणाऱ्या काळात आंदोलन तीव्र करू – कॉम्रेड दिगंबर काळे
जर आमचा प्रश्न निकाली निघाला नाही तर येणाऱ्या काळात आंदोलन तीव्र केल्या जाईल. सर्व वंचितांची बैठक घेऊन विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेऊ, प्रसंगी आगामी हिमायतनगर नगरपंचायतीत आमच्या मजूर सांघटनेकडून 17 वार्डामध्ये गोरगरीब मजूर उमेदवार उभा करून आमच्या न्याय हक्कासाठी त्यांना निवडून आणू असा पवित्र घेणार असल्याचे त्यांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलताना सांगितले आहे. केवळ नमवून नंबर ४३ मिळत नसल्याने मंजूर झालेल्या घरकुलाच्या लाभापासून आमच्या गोरगरीब मजुरदाराना हक्काच्या घरापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे हिमायतनगर नगरपंचायतीत मागील पंचवार्षिक काळापासून चालत असलेल्या ढिसाळ कारभाराचा प्रत्यय दिसून येत असून, जो पर्यंत आम्हाला जिल्हाधिकारी यांना पाठविलेला प्रस्तावाचे ठोस पुरावे लेखी पत्र दिले जात नाही तोपर्यन्त आमचे पुढील आंदोलन तीव्र होणार असल्याचे कॉम्रेड दिगंबर काळे यांनी म्हंटले आहे.
नगरपंचायतीला कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळत नसल्याने किंवा येथील अंधाधुंद कारभाराची पोलखोल होईल यामळे नगरपंचायतीचा कारभार प्रभारी अंधकाऱ्याची नेमणूक करून चालविल्या जात आहे. त्यामुळे हिमायतनगर शहरातील नागरिकांना नागरी सुविधा व शासकीय योजनांच्या फायद्यापासून गोरगरिबांना त्यांच्या मालकी हक्काच्या प्रमाणपत्रापासून दूर ठेवण्याचे षडयंत्र रचून जागा बळकावण्याचा पर्यटन तर केला जात नाही अशी शंकाही आता उपस्थित होऊ लागली आहे. जर 70 वर्षांपासून त्या जागेवर वास्तव्य करूनही मालकी हक्काचे प्रमाणपत्र देता येत नसेल तर आत्तापर्यंत आमच्याकडून ग्रामपंचायत व सध्याचे नगरपंचायतीने सर्व प्रकारचा कर कोणत्या आधारावर वसूल केला..? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. आगामी काळात यावर तोडगा निघून आमच्या सर्व गावठाणातील नागरिकांना नमुना नंबर 43 मालकी हक्काचे प्रमाणपत्र मिळाले नाही तर आमच्याकडे वसूल केलेल्या कराचा हिशोब मागण्यासाठी देखील आम्हाला आंदोलन उभारावे लागेल आणि हे नगरपंचायती प्रशासनाला परवडणारे नाही असा निर्वाणीचा सल्लाही कॉम्रेड काळे यांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलताना दिला आहे.
निवडणूक पूर्वी सत्ताधारी लोकप्रतिनिधीं गोर गरिबांचे मते लाटण्यासाठी बेंबीच्या देठापासून ओरडून सांगून आश्वासन देतात. मग आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी गावठाणातील वंचित नागरिकांना नमुना नंबर 43 मिळवून देण्यासाठीच्या असलेल्या जाचक अटीं बाबतचा प्रश्न विधानसभेमध्ये का..? उपस्थित करत नाहीत असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे. केवळ जनतेला आश्वासनाची खैरात देऊन कोपराला गुळ लावायचा आणि त्यांची मते लाटायची व पाच वर्ष सत्तेत राहून फळ चाखायची..? एवढेच काम लोकप्रतिनिधी करत आहेत असं म्हटल्यास वावगे ठरणार नाही.