Homeनांदेडforest division officer Rohit Jadhav : वनपरीक्षेत्र अधिकारी रोहित जाधव यांच्या पाठपुरवठ्याला...

forest division officer Rohit Jadhav : वनपरीक्षेत्र अधिकारी रोहित जाधव यांच्या पाठपुरवठ्याला यश -NNL

श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्णपीठ असलेल्या माहूर येथे रेणुका माता मंदिर व दत्तशिखर,सती अनुसूया माता मंदिर,शेख फरीद धबधबा,मानभाव पथीयाचे देवदेवेश्वर मंदिर, कैलास टेकडी,सोनापीर बाबा दर्गा,पाडवलेनी, मात्रुतिर्थ,या सह विविध मठ, आश्रम आहेत,येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.या करिता आता वन विभाग १५ कोटी रुपये खर्च करून विश्रामगृह उभारणार आहे. सोमवार, ७ ऑक्टोबर रोजी वनखात्याने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

माहूरला वर्षभर भाविकांची दर्शनासाठी ये-जा सुरू असते.परीक्रमा (रक्षाबंधन ). दत्त जयंती,नवरात्र, दिवाळी या दरम्यान, प्रचंड गर्दी होते. अशावेळी भाविकांना निवासाची अडचण निर्माण होते. माहूरला सार्वजनिक बांधकाम खात्याचे विश्रामगृह आहे. मात्र, त्याच्या मर्यादा आहेत. त्याला पर्याय म्हणून आता वन विभाग १५ कोटी रुपये खर्च करून प्रशस्त विश्रामगृह उभारणार आहे. माहूर-किनवट या भागातच मोठ्या प्रमाणात घनदाट जंगल आहे. या जंगलावर नजर ठेवताना, तेथील सुरक्षा सांभाळताना वन अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही निवासाचा प्रश्न भेडसावतो. त्यांनाही या विश्रामगृहामुळे मोठा दिलासा मिळणार असून पर्यटनालाही चालना मिळणार आहे.

IMG 20241010 WA0008 forest division officer Rohit Jadhav : वनपरीक्षेत्र अधिकारी रोहित जाधव यांच्या पाठपुरवठ्याला यश -NNL

“वर्षभरापूर्वीच घोषणा”
माहूरच्या या विश्रामगृहासाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, तसेच केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी आग्रही होते. १७ सप्टेंबर २०२३ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विश्राम- गृहाची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार सोमवारी या विश्रामगृहाच्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली. लवकरच वित्तीय मंजुरी मिळून निविदा प्रक्रिया सुरू होणार आहे. माहूर येथे वन विभागाचे विश्रामगृह उभारण्याच्या १४ कोटी १६ लाख ४० हजारांच्या प्रस्तावाला सोमवारी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. लवकरच या विश्रामगृहाच्या पुढील कार्यवाहीची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.या विश्रामगृहामुळे माहूरला येणाऱ्या भाविकांची,वनकर्मचाऱ्यांचीही सोय होणार आहे.

माहूर गडावर चढतांनी वसमतकर महाराज यांच्या मठाच्या बाजूला रोडटच असलेल्या राखीव वनक्षेत्रातील ०.९६ हे,वर हे विश्रामगृह गडाच्या पायथ्याशीच उभारले जाणार आहे. पहिल्या व दुसऱ्या माळ्यावर विश्रामगृह, तर तळमजल्यावर शयनकक्ष राहणार आहे. लिफ्ट, फर्निचर, बगीचा, पार्किंग, अप्रोच रोड, पंपहाउस, बोअरवेल आदी सुविधा या वातानुकूलित विश्रामगृहात राहणार आहेत. श्रीक्षेत्र माहूर गडावर वनविभागाचे विश्रामगृह व्हावे याकरीता केशव वाभळे, उपवनसंरक्षक, नांदेड, सहायक वन संरक्षक किनवट गणेश गिरी वनपरीक्षेत्र अधिकारी माहूर रोहीत जाधव यांनी पाठपूरवठा केला

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments