मुंबई| प्रसिद्ध उद्योजक तथा टाटा सन्सचे अध्यक्ष रतन नवल टाटा यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात (आयसीयू) दाखल करण्यात आले होते. ते वयाशी संबंधित आजाराने त्रस्त होते, बुधवारी रात्री उशिरा त्यांच्या निधनाची माहिती देण्यात आली.
दोन दिवसांपूर्वी टाटा सन्सचे अध्यक्ष रतन नवल टाटा यांना आयसीयूमध्ये दाखल केल्याची बातमी आली होती. मात्र त्याचा रक्तदाब बराच कमी झाला होता. यानंतर रतन टाटा यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत म्हटले की, मी ठीक आहे, काळजी करण्यासारखे काहीही नाहीत असा सांगितलं होत.
2008 मध्ये रतन टाटा यांना पद्मविभूषण हा भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला. याआधी 2000 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. रतन टाटा यांच्या निधनाबद्दल टाटा सन्सचे चेअरमन एन चंद्रशेखर म्हणाले – आम्ही रतन टाटा यांना मोठ्या हानीच्या भावनेने निरोप देत आहोत. टाटा हे समूहाचे अध्यक्ष होते. माझ्यासाठी ते गुरू, मार्गदर्शक आणि मित्र होते.