forest division officer Rohit Jadhav : वनपरीक्षेत्र अधिकारी रोहित जाधव यांच्या पाठपुरवठ्याला यश -NNL
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्णपीठ असलेल्या माहूर येथे रेणुका माता मंदिर व दत्तशिखर,सती अनुसूया माता मंदिर,शेख फरीद धबधबा,मानभाव पथीयाचे देवदेवेश्वर मंदिर, कैलास टेकडी,सोनापीर बाबा दर्गा,पाडवलेनी, मात्रुतिर्थ,या सह विविध मठ, आश्रम आहेत,येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.या करिता आता वन विभाग १५ कोटी रुपये खर्च करून विश्रामगृह उभारणार आहे. सोमवार, ७ ऑक्टोबर रोजी वनखात्याने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
माहूरला वर्षभर भाविकांची दर्शनासाठी ये-जा सुरू असते.परीक्रमा (रक्षाबंधन ). दत्त जयंती,नवरात्र, दिवाळी या दरम्यान, प्रचंड गर्दी होते. अशावेळी भाविकांना निवासाची अडचण निर्माण होते. माहूरला सार्वजनिक बांधकाम खात्याचे विश्रामगृह आहे. मात्र, त्याच्या मर्यादा आहेत. त्याला पर्याय म्हणून आता वन विभाग १५ कोटी रुपये खर्च करून ...
