नांदेड| रेतीच्या वाहनावर पोलिसांनी कोणतेही कारवाई करू नये म्हणून लाचेची मागणी करणाऱ्या भागवत तुकाराम नागरगोजे, वय -44 वर्षे, पद – सहाय्यक पोलीस निरीक्षक, वर्ग -2, नेमणुक – कुंडलवाडी पोलीस स्टेशन, ता. बिलोली जि. नांदेड रा. होनिहीप्परगा ता. उदगीर जि. लातूर, नारायण मारोतराव शिंदे, वय -36 वर्षे, पद – पोलीस उप निरीक्षक, वर्ग -2, नेमणूक – कुंडलवाडी पोलीस स्टेशन ता. बिलोली, जि. नांदेड रा. कोकर कॉलनी मानवत ता. मानवत जि. परभणी यांनी 25,000/- रूपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती 17,000/- रूपये लाच स्वीकारल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक (ACB action against Assistant Police Inspector) विभागाने कार्यवाही केली आहे.

तक्रारदार यांचेकडे एक हायवा वाहन असून, ते या वाहनाने कायदेशीर परवानगी असलेल्या वाळूच्या ठेक्यावरून ऑर्डर मिळाल्याप्रमाणे वाळू वाहतूक करतात. त्यांचा वाळू वाहतुकीचा हायवा पोलीस स्टेशन कुंडलवाडी जिल्हा नांदेड चे हद्दीतून वाळू वाहतूक करताना त्यावर पोलिसांनी कोणतेही कारवाई करू नये या करिता आरोपी नारायण मारोतराव शिंदे, वय -36 वर्षे, पद – पोलीस उप निरीक्षक, वर्ग -2, नेमणूक – कुंडलवाडी पोलीस स्टेशन ता. बिलोली, जि. नांदेड रा. कोकर कॉलनी मानवत ता. मानवत जि. परभणी यांनी पडताळणी दरम्यान स्वतःसाठी 10000 रुपये व भागवत तुकाराम नागरगोजे, वय -44 वर्षे, पद – सहाय्यक पोलीस निरीक्षक, वर्ग -2, नेमणुक – कुंडलवाडी पोलीस स्टेशन, ता. बिलोली जि. नांदेड रा. होनिहीप्परगा ता. उदगीर जि. लातूर यांच्यासाठी 15000 रुपयांची मागणी केली.

त्यानंतर पडताळणी दरम्यान तडजोडी अंती आलोसे क्रमांक 2 यांनी स्वतःसाठी 7000 रुपये व आलोसे क्र 1 यांचे साठी 10000 हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. तसेच भागवत तुकाराम नागरगोजे, वय -44 वर्षे, पद – सहाय्यक पोलीस निरीक्षक, वर्ग -2, नेमणुक – कुंडलवाडी पोलीस स्टेशन, ता. बिलोली जि. नांदेड रा. होनिहीप्परगा ता. उदगीर जि. लातूर यांनी पडताळणी दरम्यान सदरची लाच रक्कम आरोपी क्रमांक 2 यांच्याकडे देण्यास सांगितले. त्या प्रमाणे नारायण मारोतराव शिंदे, वय -36 वर्षे, पद – पोलीस उप निरीक्षक, वर्ग -2, नेमणूक – कुंडलवाडी पोलीस स्टेशन ता. बिलोली, जि. नांदेड रा. कोकर कॉलनी मानवत ता. मानवत जि. परभणी यांनी17000 रुपये लाच रक्कम पंचांसमक्ष पोलीस ठाण्यात स्वीकारली आहे. यावेळी दोन्ही आरोपीना ताब्यात घेण्यात आले असून पोलीस ठाणे कुंडलवाडी येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे

संदीप पालवे, पोलीस अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो, नांदेड, परिक्षेत्र, नांदेड. मो.क्र. ९५४५५३१२३४, मा.डॉ. संजय तुंगार, अपर पोलीस अधीक्षक अँटीकरप्शन ब्युरो नांदेड परिक्षेत्र, नांदेड मो.क्र. ९९२३७०१९६७, पर्यवेक्षण अधिकारी प्रशांत पवार पोलीस उप अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो, नांदेड
मो.क्र. ९८७०१४५९१५ यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा व तपास अधिकारी श्रीमती प्रीती रमेश जाधव ,
पोलीस निरीक्षक, अँटी करप्शन ब्युरो, नांदेड, सापळा कारवाई पथक- पोलिस अंमलदार राजेश राठोड, बालाजी मेकाले , ईश्वर जाधव सर्व नेम. अँटी करप्शन ब्युरो टीम, नांदेड यांनी केली आहे.

नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही लोकसेवकाने, शासकीय अधिकारीध्कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजंट) यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ खालील क्रमांकावर संपर्क साधावा दुरध्वनी 02462-253512, टोल फ्रि क्रमांक 1064.