नवीन नांदेड| शिवसेना ऊबाठा गट सिडको शहर यांच्या वतीने शहरप्रमुख जितुंसिग टाक यांच्या मार्गदर्शना खाली शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त महात्मा गांधी निवासी अपंग विघालय सिडको दक्षिण जिल्हा प्रमुख भुजंगराव पाटील व मान्यवर यांच्या हस्ते विध्यार्थ्यांना 23 जानेवारी रोजी फळे वाटप (Fruit distribution) करण्यात आले.


दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सिडको शहर प्रमुख जितुंसिंग टाक यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त अपंग विघालय येथे फळे वाटप करण्यात आले यावेळी प्रारंभी महामनाव डॉ.बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज ,नेताजी सुभाषचंद्र व शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यानंतर जिल्हाप्रमुख भुजंगराव पाटील डक यांच्या सत्कार सिडको शहर शिवसेनेचा वतीने करण्यात आला करण्यात आला, यावेळी शिवसेना भारतीय कामगार सेनेचे माजी जिल्हाध्यक्ष ब्रिजलाल ऊगवे,
माजी उपजिल्हाप्रमुख व्यंकोबा येडे , माजी शहर प्रमुख साहेबराव मामीलवाड,निवृती जिकलंलाड,प्रमोद मैड,महिला संघटक निकीता शहापुरवाड ,संदीप जिल्हेवाड,गौरव दरबस्तवार,आनंदा वाघमारे यांच्या सह शिवसैनिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृष्णा पांचाळ,यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीते साठी एन.जी.वाघमारे, भास्करे ,सुरेवाड,मस्के यांनी सहकार्य केले.
