उस्माननगर, माणिक भिसे l येथून जवळच असलेल्या मौजे तेलंगवाडी ता.कंधार येथे झालेल्या ढगफुटी सदृश्य परिस्थितीत शेतातील लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.


दिनांक 29 ऑगस्ट रोजी शुक्रवार दोन दिवसांपूर्वी झालेल्या ढग फुटी दृश्य मुसळधार पावसाने दाणादाण उडविली होती. तेलंगवाडी ता.कंधार येथील शेतकऱ्यांचे गट क्रमांक 300 मध्ये सौर ऊर्जा पॅनल , कृषी पंप , ( SPAN PUMP , COMPANY )चे ५ एच पी. मोटार , व संपूर्ण सौर उर्जा वाहून गेले . याचबरोबर शेतातील खरीप पिक खरडून गेले असून कडक शेतात दिसत आहे. लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.


सर्वाधिक नोंद कंधार लोहा मतदारसंघात झाली दोन्ही तालुक्यातील अनेक गावांना पुराच्या पाण्याचा वेढा घातला होता पुरामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी जिल्हाचे पालकमंत्री अतुल सावे व आ. प्रताप पाटील चिखलीकर यांनी नुकसान ग्रस्त गावांना भेटी देऊन पूर परिस्थितीची पाहणी केली नांदेड जिल्ह्यातील सर्वाधिक विक्रमी पावसाची नोंद कंधार लोहा तालुक्यात झाली आहे.


गेल्या आठवड्यात झालेल्या ढगफुटी पावसाच्या तडाख्यातून कंधार तालुक्यातील परिस्थिती सावरण्यापूर्वीच दुसऱ्यांदा पावसाचा तडाखा बसला कंधार तालुक्यातील तेलंगवाडी येथील शेतकरी राजु व्यंकटराव बास्टे यांच्या शेतातील पुरामुळे शेताचे नुकसान व शेतातील सोलार प्लांट व मोटर पाईप स्टार्टर व इतर शेतातील वस्तू पुरात मोठ्या प्रमाणात वाहून गेल्यामुळे शेतातील सोयाबीन व कापूस अदी पिकाच मोठ्या प्रमाणात नुकसान झाला आहे.


तरी त्यांनी माध्यमांशी भावनिक प्रतिक्रिया या ठिकाणी दिली आम्हाला भरपाई द्या अन्यथा आम्ही आत्महत्या करणार कारण शेती हा आमचा जीवन आवश्यक व्यवसाय आहे शेतीवर आमचं जीवण आधारित आहे तात्काळ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी असं शेतकऱ्यांनी माध्यमाशी भावनिक प्रतिक्रिया दिली आहे.तरी संबंधित अधिकारी यांनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे


