नवीन नांदेड| नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत असलेल्या मातृ सेवा आरोग्य केंद्र येथे 23 जानेवारी रोजी दैनंदिन सेवक वेळेवर न आल्याने संतप्त झालेल्या अनेक रूग्णांनी दवाखाना उघडा ओरड केल्यानंतर अखेर केंद्राच्या बाहेर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी य संबंधीत गेटचे कुलूप तोडले (after almost two hours) व रूग्णांनी व कर्मचारी यांनी प्रवेश केला. या प्रकरणी संबंधित वैद्यकीय अधिकारी के.एन.शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता संबंधीत कर्मचारी न आल्याने कुलुप तोडले व याप्रकरणी संबंधीत कर्मचारी यांना नोटीस बजावणार असल्याचे सांगितले.

नावा मनपाच्या सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत असलेल्या मातृ सेवा आरोग्य केंद्र येथे जवळपास 65 हजार लोकसंख्या असलेल्या या दवाखान्यात एक अधिकारी व जवळपास 40 कर्मचारी कार्यरत असुन गेल्या अनेक वर्षांपासून वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी,आशा वर्कर, सेवक यांच्यी पदे असुन देखील न भरल्याने रूग्णांची वेळेवर तपासणी न करणे,औषधांचा तुटवडा,ओपीडी वेळेवर न उघडणे , वेळेच्या अगोदर बंद करणे यासह विविध कारणांमुळे दैनंदिन चर्चा मध्ये असलेला हा दवाखाना आज 23 जानेवारी रोजी चक्क मातृ सेवा रूग्णालयाचे गेट कुलूप बंद असलेल्या सेवक कर्मचारी यांनी वेळेवर उपस्थित न झाल्याने अखेर रूग्णांनी बाहेर असलेल्या कर्मचारी यांच्या कडे दार उघडा मागणी केली असता तब्बल दोन तासा नंतर कर्मचाऱ्यांनी गेटचे कुलूप तोडून काढले व प्रवेश केला.

या प्रकरणी संबंधित वैद्यकीय अधिकारी डॉ के.एन.शिंदे यांच्या कडे चौकशी केली असता संबंधीत कर्मचारी आज आला नसल्याचे सांगुन त्याच्याजवळ गेटच्या चावी आहे , परंतु आज न आल्याने उशिर झाल्याचे सांगितले,संबंधीत कर्मचारी यांना नोटीस बजावणार असल्याचे सांगितले असुन या केंद्रात दोन वैद्यकीय अधिकारी असतांना केवळ एकच वैद्यकीय अधिकारी कार्यभार सांभाळत आहे, कर्मचारी यांच्या वर नियंत्रण नसल्याने अवेळी येणे जाणे यासह अनेक तक्रारी आहेत. मनपा प्रशासनाने तात्काळ दखल घेत गेल्या अनेक महिन्यां पासून रूंग्नाची होणारी गैरसोय टाळावी व नव्याने वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी नेमण्याची मागणी होत आहे.
