नांदेड| महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेशी संलग्न असलेल्या नांदेड जिल्हा वृत्तपत्र वितरक विकास मंडळाची (District Newspaper Distributor) काल दुपारी एक वाजता विसावा हाॅटेल मध्ये विशेष सर्व साधारण सभा पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे संस्थापक तथा महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे कार्याध्यक्ष बालाजी पवार हे होते.

या बैठकीत नांदेड जिल्हा वृत्तपत्र वितरक विकास मंडळाच्या अध्यक्षपदी चंद्रकांत घाटोळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच पुढील कार्यकारिणी सर्वानुमते बिनविरोध निवडण्यात आली. उपाध्यक्ष सतीश कदम, सचिव गणेश वडगांवकर , सहसचिव भागवत गायकवाड, कोषाध्यक्ष बाबु जल्देवार, तर कार्यकारीणी सदस्य म्हणून बालाजी चंदेल,सत्यनारायण देवरकोंडा, अनुप ठाकुर,गणेश जुजाराव ,रामेश्वर पवार,दिपक नरवाडे, बालाजी सुताडे ,यांची निवड करण्यात आली.

दुसऱ्या सत्रात बालाजी पवार यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की नांदेड जिल्हा वृत्तपत्र वितरक विकास मंडळाच्या वतीने गेल्या पंचवीस वर्षांत वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी विविध उपक्रम राबविले. त्यात कमिशन वाढ, विविध शासकीय योजना मार्गदर्शन व मोफत कार्ड वाटप, आरोग्य शिबिरे, व्यक्तीमत्व शिबिरे, वृत्तपत्र विक्रेता दिन, वृत्तपत्र वितरण सेंटर, वृत्तपत्र विक्रेत्यांना तातडीची मदत, गुणवंत पाल्यांचा सत्कार, दिवंगत कामगार नेते अनंतराव नागापूरकर यांच्या नावाने राज्यस्तरीय पत्रकारिता व वृत्तपत्र विक्रेता पुरस्कार,जिल्हा मेळाव्यात मान्यवर व्यक्तींने मार्गदर्शन, सायकल स्पर्धा,असे अनेक उपक्रम राबवले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.भालचंद्र कांगो हे होते तर प्रमुख उपस्थिती प्रसिद्ध उद्योजक तथा लोक चळवळीत सोबत देणारे बालाजी इबितदार,पत्रकार डॉ. दिलीप शिंदे, गणपत बनसोडे, आयटकचे बनसोड, काॅ शिवाजी फुलवळे होते.

यावेळी डॉ भालचंद्र कांगो बोलतांना म्हणाले की वृत्तपत्र विक्रेता बांधवांनो आणखी संघर्षासाठी तयार रहा. संघर्ष संपलेला नाही. तुम्ही छपाई माध्यमातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहात. वाढत्या महागाई च्या प्रमाणात कमिशन वाढ झाली पाहिजे. तसेच वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळाच्या दोन टप्पे जिंकलात आत्ता पुढचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळाला निधी आणि नोंदण्या झाल्या पाहिजे यासाठी संघटीत होऊन संघर्ष करा, राज्य सरकार सोबत लढा चालू ठेवा गरज पडली तेंव्हा आम्हाला आवाज द्या आम्ही सोबत आहोत. मंडळाला पैसा पाहीजे घर कामगारांचे (मोलकरीण) कल्याणकारी मंडळ केले पण त्यात ठणठणाट आहे. पैसाच नाही. तेंव्हा कल्याणकारी मंडळाच्या लढाईसाठी नुतन कार्यकारिणीला शुभेच्छा देतो असे म्हणाले.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते नुकतेच जिल्हा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी निवड झालेले संतोष पांडागळे, सुधाकर डोईफोडे पत्रकारिता पुरस्कार मिळालेले सायं दै.नांदेड वार्ताचे संपादक काॅ. प्रदीप नागापूरकर, वृत्तपत्र वितरक विकास मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत घाटोळ व कार्यकारिणीचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलतांना संतोष पांडागळे म्हणाले की माझे अनेक सत्कार झाले पण वृत्तपत्र विक्रेता संघटनेने केलेला सत्कार मनाला भावला. वृत्तपत्र विक्रेत्यांचे अत्यंत मोलाचे आहे मी त्याच्या सोबत आहे. आमचे नेते अशोकराव चव्हाण यांच्या सोबत चर्चा करून वृत्तपत्र विक्रेत्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असेही पांडागळे म्हणाले. यावेळी ग्रामीण भागातून आलेले देवबा डोरले, बापुराव बडुरे, बोरकर, चेतन चौधरी, आदी वृत्तपत्र विक्रेता बांधवांचाही डॉ भालचंद्र कांगो व मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
या सभेत संजय गोणे , खय्युम पठाण, विठ्ठल फडेवार, संजय बेरुळकर,चेतन चौधरी, देवबा डोरले तामसा , बापुराव बडुरे बरबडा, रामेश्वर बोरकर शिरड शंकर जोशी, संतोष कानगुले, प्रदिप गवारे,अशोक झोळगे, संगमनाथ भालके,आनंदा बोकारे,रमेश वंगलवार, नरेश वंगलवार, अशोक खुणे, युवराज रणवीर,विजय कठारे, दै.सत्यप्रभाचे वितरण व्यवस्थापक गणपत बनसोडे ,गणेश रत्नपारखे,शंकर वंगलवार,लक्ष्मण माळवतकर,माधव मामीडवार ,शंकर लच्छेवार,राजेश पवार तसेच जिल्हा वृत्तपत्र वितरक विकास मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.